Menu Close

सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे पाकिस्तानी महंमद शायन अली यांचा हिंदु धर्मात प्रवेश

पाककडून छळ करण्यात आल्याने सोडला होता देश !

महंमद शायन अली

नवी देहली – सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे महंमद शायन अली यांनी  हिंदु धर्मात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

१. महंमद शायन अली यांनी ट्वीट करून सांगितले की, वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानी यंत्रणांकडून छळ करण्यात आल्याने मला देश सोडवा लागला. त्या वेळी मला नैराश्य आले होते. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने माझा हात धरला. मला त्याच्याकडून शक्ती मिळाली. मी लवकरच भारतात येत आहे. माझे सर्वच पूर्वज भारतात जन्माला आले होते. मी माझी भूमी आणि लोक यांच्यामध्ये परतेन. शेवटी घर हे घरच असते. माझ्या पूर्वजांची संस्कृती आणि जीवनशैली यांना २ वर्षे पाहिल्यानंतर मी माझ्या पूर्वीच्या धर्मात परतलो आहे. माझ्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी ‘इस्कॉन’चा आभारी आहे. मी एक सनातनी असल्याने अन्य कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. सर्व परंपरांचा मी सन्मान करतो आणि अन्यांनीही तसे करावे. माझी भगवद्गीता मला प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यास शिकवते, मग तो कोणत्याही धर्माचा असो. मी सर्वांची क्षमा मागतो ज्यांना मी माझ्या जीवनात जाणीवपूर्वक आणि अजाणतेपणे दुःख दिले. मला माझ्या धर्मात येऊन गर्व अनुभवायला मिळत आहे. मला आशा आहे की, माझ्या पूर्वजांनाही असेच वाटत असेल.

२. यापूर्वी महंमद शायन अली यांनी ‘पाकिस्तान सोडण्याची माझी गोष्ट’ या नावाने एक ट्वीट केले होते. यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने अली यांना कसा त्रास दिला, याची माहिती दिली होती. अली यांच्यावर भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चा हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांना ठार माण्याचाही कट रचण्यात आला होता.

३. अली यांनी पुढे म्हटले होते,  ‘पाकिस्तान’ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. पाकिस्तानची स्थापना धर्माच्या आधारे करण्यात आली होती ज्याची आवश्यकता नव्हती. माझ्या आजी-आजोबांनी पाकिस्तान निवडला; कारण ते मुसलमान होते. ही त्यांची सर्वांत मोठी चूक होती.’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *