Menu Close

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या ! -संपादक 

हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे एका कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांत २ पाद्य्रांचा समावेश आहे. मैकू, सुमित, अधिराज आणि शिवनंदन अशी त्यांची नावे आहेत. यांतील अधिकराज आणि शिवनंदन हे दोघे पाद्री आहेत.  त्यांच्यावर विनाअनुमती ख्रिस्ती शाळा चालवण्याचाही आरोप आहे.

तक्रारदार विजय यांचा मुलगा सौरभ याला ब्रेन ट्यूमर होता. आरोपींनी त्याचा आजार बरे करण्याचे आश्‍वासन दिले. काही दिवस त्यांनी मुलावर काही उपचार केले; मात्र तो बरा न झाल्याने त्यांनी विजय यांना ‘तुमच्या कुटुंबाने धर्मांतर केल्यास मुलगा बरा होईल, तसेच तुम्हाला १ लाख रुपयेही देण्यात येतील’, असेही सांगितले. त्यांनी ५ सहस्र रुपये दिले आणि मुलाच्या गळ्यात क्रॉस चिन्हाचे पदक घातले. नंतर त्यांनी घरातील देवतांच्या मूर्ती फेकून दिली. याची माहिती शेजार्‍यांना मिळाल्यावर त्यांनी धर्मांतराला विजय यांच्या कुटुंबियांच्या धर्मांतराला विरोध केला. यामुळे आरोपींनी विजय यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे विजय यांनी आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *