Menu Close

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

प्रशासनाने जमावबंदीचे लागू केल्याचा परिणाम

हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ? -संपादक 

उत्तरकाशी (उत्तराखंड) – उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी महापंचायतीपूर्वी त्याचे आयोजन करणार्‍यांना आणि संबंधितांना नजरबंद करण्यास चालू केले होते.

सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया 

या महापंचायतद्वारे लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा, हिमाचल प्रदेशप्रमाणे भू-कायदा लागू करणे, चार धाम यात्रेमध्ये मुसलमानांना प्रतिबंधित करणे, राज्यात ओळख लपवून काम करण्यावर बंदी घालणे, वक्फ बोर्ड विसर्जित करणे, सनातन बोर्ड स्थापन करणे आदी मागण्या करण्यात येणार होत्या.

महापंचायतीचे आयोजक स्वामी दर्शन भारती यांना धर्मांध मुसलमानाकडून शिरच्छेद करण्याची धमकी

धर्मांध मुसलमानांच्या विरोधात हिंदू उभे राहिले की, धर्मांध त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात. याद्वारे हिंदूंमध्ये दहशत निर्माण करतात, ही दहशत मुळापासून मोडून काढण्याचा प्रयत्न भाजप सरकारने करणे आवश्यक आहे !

महापंचायतीचे आयोजक स्वामी दर्शन भारती यांना धर्मांध मुसलमानाकडून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वामी दर्शन भारती हे ‘देवभूमी रक्षा अभियाना’चे संस्थापक आहेत. या धमकीनंतर त्यांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या संदर्भात एक भित्तीपत्रक धर्मांधांनी त्यांना पाठवले आहे. ‘मुशर्रते इंकलाब’ नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे, ‘पुरोला उत्तरकाशीमध्ये तुमची महापंचायत नको. रा.स्व. संघ आणि भाजपचे भगवे आतंकवादी यांनी जर आमच्या कोणत्याही व्यक्तीला हानी पोचवली, तर तुझा शिरच्छेद केला जाईल आणि ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचा विनाश) उत्तरखंड पासून चालू होईल.’

तसेच शेवटी जो कुणी शिरच्छेद करील त्याला ५ कोटी रुपये देण्यात येतील, असेही लिहिले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *