Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी कर्नाटक येथील ‘पेजावर मठा’चे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांचा शुभसंदेश

सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे !

‘पेजावर मठा’चे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे) आयोजन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विश्वात हिंदूंसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. या विश्वामध्ये आणि समाजामध्ये हिंदूंना सन्मानाने जगायचे असेल, तर ही जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व समविचारी संस्था किंवा संघटना यांनी एकत्र येऊन मनन आणि चिंतन करावे. हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।

श्रीकृष्णार्पणमस्तु ।’

– पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी, पेजावर मठ, कर्नाटक (जून २०२३)

Related News

0 Comments

  1. Vinodh Kumar

    Alchohol is mentioned in Vedas in the list of ‘Pancha Papas’ or five immoral actions. On the other hand Jesus says about himself in the Bible book that, he is an alchoholic. So it is better for the Spaniards to put Jesus’ pic on their products for a maga sale.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *