Menu Close

पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्याविषयी निवेदन

belgaum_nivedan
अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

बेळगाव : देहली विद्यापिठात पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारक भगतसिंग, सूर्यसेन आणि चंद्रशेखर आझाद यांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी २३ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी यांच्या वतीने निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ यांना देण्यात आले.

या वेळी बेळगाव येथील हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री यल्लाप्पा पाटील, सुधीर हेरेकर, विजय नंदगडकर, मुतागा येथील धर्माभिमानी सर्वश्री सचिन पाटील, बाळकृष्ण पाटील, मारुति पाटील, प्रशांत चौगुले, रोहित लोहार, चल्वेनहट्टी गावातील श्री. विनोद पाटील, बसुर्ते गावातील श्री. ज्ञानेश्‍वर गावडे, कलखंब गावातील श्री. परशुराम हिरोजी हे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *