नगर : शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्यावरून दर्शन चालू झाल्याने स्वयंभू मूर्तीची होणारी झीज, चौथर्यावर भाविकांच्या हातून तेल सांडल्याने घसरून पडल्याने महिला आणि मुले यांना होणारी इजा, दर्शनासाठी होत असलेला विलंब या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चौथर्यावरून दर्शनाची पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणी पुणे येथील भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेने केली आहे.
(या सर्व घटनांबरोबरच धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी श्री शनिदेवाच्या चौथर्यावरील प्रवेश बंद होणे सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठीही आंदोलनातून आवाज उठवावा, अशी भाविकांची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संघटनेने शनैश्वर देवस्थानला लेखी निवेदन पाठवले असून येत्या ६ जून या दिवशी २०० कार्यकर्त्यांसह शनिशिंगणापूर येथे चौथरा बंद आंदोलन करण्याची चेतावणी संघटनेने दिली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भारत अगेन्स्ट करप्शन संघटना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात