कलम ३७० हटवूनही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून काश्मीर, पुणे
रामनाथी – अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही. हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशात ६० हून अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामी जिहादी डोके वर काढत आहेत. ज्या काश्मीरने भारताला भरतमुनी दिले, तो काश्मीर आज हिंदूमुक्त झाला आहे. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याचा हा परिणाम आहे. सद्यःस्थितीत काश्मीरमधील ९९ टक्के मुसलमान जिहादी विचारांचे आहेत. वर्ष १९५९ मध्ये नरसंहाराविषयीचा कायदा संसदेत पारित करण्यात आला; मात्र अद्यापही तो अद्यापही लागू झालेला नाही. भारतातील हिंदु धर्म नष्ट करायचा असेल, तर प्रथम येथील संस्कृती नष्ट करायला हवी, जिहाद्यांनी ओळखले आहे. काश्मिरी हिंदूंवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी करण्यात आले आहे. मागील १ सहस्र वर्षे काश्मिरी हिंदूंवर इस्लामी आक्रमणे होत आहेत, वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंचे ७ वे पलायन होते. येथील ३७० कलम हटवण्यात येऊनही अद्यापही काश्मीर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे परखड उद्गार पुणे येथील ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी (१७.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
या वेळी व्यासपिठावर राजस्थान येथील ‘संयुक्त भारतीय धर्म संसद’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर, बेंगळुरु (कर्नाटक) येथील श्री. प्रशांत संबरगी, ‘राष्ट्र-धर्म संघटने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष केंचम्बा हे मान्यवर उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महायज्ञामध्ये प्रत्येक हिंदु कुटुंबातील सदस्यांनी आहुती द्यावी ! – आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्म संसद, राजस्थान
पूर्व जगभर हिंदु संस्कृती होती. आता तेथे अन्य धर्मीय राज्य करत आहेत. काही वर्षांपूर्वी हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले. सध्या देशात ६०० ठिकाणी छोटे पाकिस्तान बनले आहेत. तेथूनही हिंदू हळूहळू पलायन करत आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर सर्व हिंदूंनी जात आणि स्वार्थ यांच्या पलीकडे जाऊन संघटित झाले पाहिजे. देशभरात अनेक जातीयवादी नेते आहेत. त्यांचे जातीआधारित राजकारण चालू आहे. त्यामुळे ते हिंदूंना संघटित होऊ देत नाहीत. त्यामुळे हिंदू धर्माच्या आधारावर एकत्र येत नाहीत. देशातील सर्व संत समाजाने हिंदु राष्ट्राची स्थापना करायचे ठरवले, तर त्यांना थांबवण्याचे सामर्थ्य कोणातच नाही. त्यामुळे संतांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हावे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महायज्ञामध्ये प्रत्येक हिंदु कुटुंबातील सदस्यांनी आहुती दिली, तर हा देश निश्चित हिंदु राष्ट्र बनेल.
बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक ! – संतोष केंचम्बा, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र धर्म संघटन
रामनाथी – देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे. हे ‘कथानक युद्ध’ निपटण्यासाठी योग्य कथा सिद्ध करून त्याचा प्रसार करावा लागेल. हे बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष केंचम्बा यांनी वैश्विक अखिल भारतीय हिंदु महोत्सवात बोलतांना व्यक्त केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या दुसर्या दिवशीच्या तृतीय सत्रात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा प्रसार योग्य तर्हेने झाला पाहिजे. हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे हे आपण सर्वांचे दायित्व आहे. भारतातील गुरु-शिष्य परंपरेच्या अंतर्गत योग्य कथांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीचा प्रसार होत असे. ही परंपरा पुनर्जिवित करून कथांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे.
‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक
रामनाथी – हिंदु व्यापार्यांचा व्यवसाय मुसलमानांनी बळकावला आहे. मटण, चिकन विक्रीच्या व्यवसायामध्ये मुसलमानांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. याचा अपलाभ उठवत मुसलमान ‘हलाल’ चिकन-मटणची विक्री करत आहेत. मुसलमानांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बेरोजगार हिंदु तरुणांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे. १५ टक्के मुसलमानांनी ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ पद्धती लादली आहे. ‘हलाल’पासून सुटका करून घेतांना कायदेशीर प्रणाली आणि पर्यावरण प्रणाली यांची ढाल पुढे केली जात आहे. हिंदूंनी ‘हलाल’ चिकन-मटण न खाता ‘झटका’ चिकन-मटण खाण्याचा निर्धार केला पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेतला पाहिजे. ‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती अभियान राबवले पाहिजे, असे मत बेंगळुरू, कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रशांत संबरगी यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी व्यक्त केले.
श्री. प्रशांत संबरगी पुढे म्हणाले की,
हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे. ग्राहक मंचाने ‘झटका’ मांसाला अनुमती देणारे निकाल दिले आहेत. हिंदूंना ‘झटका’ मांस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही कृतीदल सिद्ध केले आहे. या कृतीदलाच्या माध्यमातून बेरोजगार हिंदु तरुणांना ‘झटका’ मांस उपलब्ध करून देणारी दुकाने चालू करण्यासाठी साहाय्य केले जात आहे, असे श्री. संबरगी यांनी सांगितले.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित राहिलेल्या वंदनीय मान्यवरांचा विशेष सन्मान
१. राजस्थान येथील ‘संयुक्त भारतीय धर्म संसद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आचार्य राजेश्वर (डावीकडून दुसरे) यांचा हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
२. पुणे येथील पू. सुरेश पुराणिक (डावीकडे) यांचा हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
३. कर्नाटकातील किक्षिंधा अंजनेय हनुमान मंदिराचे महंत श्री. विद्यादास महाराज (डावीकडे) यांचा हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. मोहन गौडा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.