Menu Close

‘धर्मांतरण, घरवापसी’ या विषयावर ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावीकडून राहुल दिवान, श्री. कुरु ताई, सौ. भक्ती डाफळे आणि सौ. ज्योती शर्मा

हिंदूंनी धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे ! – राहुल दिवान, अध्यक्ष, शरयू ट्रस्ट, नवी देहली

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यासमवेत आता ‘ब्लॅक मॅजिक जिहाद’ही करण्यात येत आहे. ‘हलाल’ची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेएवढी झाली आहे. मुसलमानांची वाढती संख्या आणि हिंदूंची घटती संख्या हे भारताला पुन्हा विभाजनाकडे नेत आहेत. यातून भविष्यात गृहयुद्ध निश्चित आहे. या परिस्थितीतही हिंदू आक्रमणाची नाही, तर संरक्षणनीती अवलंबत आहेत. यापुढे हिंदूंनी विस्तारवादी भूमिका स्वीकारायला हवी. यापूर्वीही भारत अखंड होता, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. वर्ष २०३० पर्यंत हिंदूंनी १० कोटी धर्मांतरितांना त्यांच्या इच्छेने पुन्हा स्वधर्मात आणण्याचे ध्येय ठेवायला हवे. यासाठी सर्व मंदिरांमध्ये घरवापसीचे फलक लावायला हवेत. धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी मंदिरांमध्ये विधी करायला हवेत. ख्रिस्ती मिशनरी हिदूंचे धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनीही धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करायला हवे, असे आवाहन नवी देहली येथील ‘शरयू ट्रस्ट’चे अध्यक्ष राहुल दिवान यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

या वेळी व्यासपिठावर छत्तीसगड येथील ‘हिंदु जागरण मंचच्या प्रांत सहसंयोजक सौ. ज्योती शर्मा, ‘अरुणाचल प्रदेश बांबू संशोधन आणि विकास एजन्सी’चे उपाध्यक्ष श्री. कुरु ताई, हिंदु जनजागृती समितीच्या सातारा येथील समन्वयक सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्तीसगडमध्ये ४ वर्षांत हिंदूंच्या धर्मांतरामध्ये वाढ ! – सौ. ज्योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

सौ. ज्योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

विद्याधिराज सभागृह – कोणत्याही राज्यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. अशा धर्मांतरितांची हिंदु धर्मामध्ये ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जागरण मंचच्या प्रांत सहसंयोजक सौ. ज्योती शर्मा यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चतुर्थ दिवशी केले.

‘छत्तीसगडमध्ये धर्मांतराची ‘मोडस ऑपरेंडी’ (व्यक्ती किंवा समूह यांची कार्य करण्याची विशिष्ट पद्धत) या विषयावर बोलतांना सौ. शर्मा म्हणाल्या, ‘‘प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. ते धर्मांतरासाठी हिंदु महिलांना आर्थिक लाभ, तर मुलांना शिक्षण आणि नोकरी यांचे प्रलोभन देतात. त्यासाठी त्यांना जवळच्या चर्चमध्ये बोलावण्यात येते. त्याप्रमाणे घरातील पुरुष कामावर गेल्यावर या महिला दुपारच्या वेळी चर्चमध्ये जातात. तेथे गेल्यानंतर ‘तुमचे देव चांगले नाहीत’, असे सांगण्यात येते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु महिला देवपूजा करणे आणि तुळशीपूजन करणे थांबवतात. दुसर्‍या रविवारपासून पीडित महिलांना पैसे आणि रेशन मिळणे चालू होते. त्यांचे पूर्ण धर्मांतर झाल्यानंतर ६ मासांनी अशा महिलांना मिळकतीतील १० वा हिस्सा दान करण्यास सांगण्यात येते. ज्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांना पाद्रयांना रेशन देण्यास सांगण्यात येते. त्यामुळे घरांमध्ये भांडणे चालू होतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्याचे पुरावे असल्यास धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हेही नोंद करता येतात.’’

पुढील ५ वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू ! – श्री. कुरु ताई, उपाध्यक्ष, बांबू संसाधन आणि विकास एजन्सी, अरुणाचल प्रदेश

श्री. कुरु ताई, उपाध्यक्ष, बांबू संसाधन आणि विकास एजन्सी, अरुणाचल प्रदेश

विद्याधिराज सभागृह – केरळ उच्च न्यायालयात वर्ष २००६ मध्ये धर्मांतरित हिंदूला अनुसूचित जातीच्या सुविधा देण्याविषयी एका याचिकेवर सुनावणी झाली. त्याची चर्चा अरुणाचल प्रदेशमधील आम्हा हिंदूंमध्येही झाली. यावरून तेथील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. आम्ही तेथील धर्मांतराच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाय काढला आहे. जी हिंदु व्यक्ती अन्य धर्मांतील व्यक्तीशी विवाह करील, तिला तिच्या कुटुंबातील संपत्ती मिळणार नाही आणि तिची मुलेही तिला स्वतःलाच सांभाळावी लागतील. अरुणाचल प्रदेशमधील आम्ही हिंदू संघटित आहोत. त्यामुळे तेथील समस्येची काळजी करण्याची आवश्यकता नाही. पुढील ५ वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश बांबू संसाधन आणि विकास एजन्सीचे उपाध्यक्ष श्री. कुरु ताई यांनी केले.


श्री. कुरु ताई यांनी सांगितलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे

१. अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक कुटुंबातील १ तरी सदस्य धर्मांतरित आहे. एका सदस्यामुळे संपूर्ण हिंदू कुटुंब ख्रिस्ती बनते.

२. मध्यंतरी एका हिलिंग (उपचार) कार्यक्रमासाठी बिहारमधून २ पाद्री आणि अरुणाचल प्रदेशमधील १ पाद्री आले होते. त्यांनी असाध्य रोग बरे करण्याचा दावा केला. हे आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना तेथील आर्.के. मिशनच्या रुग्णालयातील कर्करोगाच्या रुग्णांना बरे करण्याचे प्रसारमाध्यमांसमोर आव्हान दिले. तेव्हा त्या पाद्य्रांनी नकार दिला. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या तेथील ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आम्ही उघड करत आहोत.

श्री. कुरु ताई यांची धर्मकार्याची तळमळ !

श्री. कुरु ताई यांच्या धर्मकार्याची तळमळीविषयी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे

१. श्री. कुरु ताई हे अरुणाचल प्रदेशमधील अत्यंत दुर्गम प्रदेशातील डोंगराळ भागात रहातात. तेथे जाणे-येणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत श्री. ताई हे तेथील २६ हिंदु जमातींना संघटित करून हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे कार्य करत आहेत. अशा प्रकारचे काम तेथे करणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्यात संघटन करण्याचा आणि इतरांविषयी प्रेमभाव हे गुण आहेत.

२. श्री. ताई यांच्यात राष्ट्र-धर्माच्या कार्याविषयी असलेल्या तळमळीमुळे अरुणाचल प्रदेश येथून ४ फ्लाईट बदलून ते वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी उपस्थित राहिले आहेत.

३. श्री. ताई यांची मूळ भाषा निराळी आहे. त्यांना हिंदी भाषेत बोलण्यात अडचण येते. तरीही हिंदुत्वाच्या कार्याप्रती असलेल्या तळमळीमुळे आणि महोत्सवात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना कार्य कळण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेतून भाषण केले.

४. अरुणाचल प्रदेशातील हिंदूंच्या समस्यांविषयी त्यांचा चांगला अभ्यास असून त्यावर त्यांनी चांगल्या उपाययोजना काढून त्यानुसार कृतीही करून तेथील हिंदूंच्या स्थितीविषयी चिंतामुक्त केले आहे.

५. श्री. कुरु ताई यांच्यात धर्मकार्याची तळमळ असून त्यांच्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अत्यंत भाव आणि धर्मनिष्ठा आहे.

लव्ह जिहादच्या उपयोग करून भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत ! – सौ. भक्ती डाफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

सौ. भक्ती डाफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

विद्याधिराज सभागृह – छत्तीसगड येथील आदिवीसी भागांत बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्याचे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक पूर्ण गाव मुसलमानबहुल झाला आहे. लव्ह जिहादचा उपयोग करून अशा पद्धतीने भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत. पूर्वी मोगल हिंदूंना भींतीमध्ये चिणून मारत होते. सद्य:स्थितीत हिंदु युवतींचे तुकडे करून शीतकपाटात ठेवले जात आहेत. मोगलांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतर केले. आता प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदु युवतींचे धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदु युवतींना आपला गौरवशाली इतिहास सांगायला हवा. संस्कारी मातेमुळेच आपणाला छत्रपती शिवाजी महाराज लाभले. हिंदु युवतींनी धर्मशिक्षण घेतले, तर त्या लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. हिदु युवतींना हिंदु संस्कृती शिकवायला हवी. धर्मानुसार आचरण केले, तर लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. लव्ह जिहादविषयी गावागावांत जागृती करण्यासाठी आपणाला अभियान राबवायचे आहे. वसतीगृह, गाव, शहर येथील हिंदु युवतींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण आपणाला द्यायला हवे. या अभियानात धर्मप्रेमींनी सहभागी व्हावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *