वीरशैव लिंगायत हे हिंदूच ! – पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपति, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड, नांदेड, महाराष्ट्र
रामनाथ देवस्थान – लिंगायत ही बोलीभाषा आहे. त्यामुळे ‘वीरशैव लिंगायत’ असेच म्हणायला पाहिजे. ते हिंदु धर्मानुसार उपासना करत असून सर्व हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत हिंदु धर्मापासून वेगळे नसून अभिन्न आहेत. आमचा हिंदु राष्ट्राच्या या कार्यामध्ये सदैव सहभाग राहील. तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये कुठेही हिंदु धर्मावर आघात झाला, तर तेथेही आम्ही सर्वजण तुमच्या समवेत आहोत, असे मत पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
स्वामीजी पुढे म्हणाले,
‘‘अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतात विविध संप्रदाय असले, तरी सर्वजण हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत. गेल्या १० वर्षांपासून लिंगायत आणि वीरशैव यांना वेगळे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नाही, तर ‘फोडा आणि राज्य करा’, हे धोरण अवलंबून त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवाची उपासना करणारा लिंगायत आहे. गळ्यामध्ये लिंग धारण केल्याने त्याला ‘लिंगायत’ म्हणतात. लिंग हे शिवाचे प्रतीक आहे. त्यामुळे तो वीरशैव आहे. शिव आणि जीव यांचे एैक्य करण्याची विद्या शिकणारा वीरशैव आहे.’’
‘हलाल’मधून हिंदूंचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी जात आहे ! – श्री. कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु ईकोसिस्टम
विद्याधिराज सभागृह – वर्ष २०२२ मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी नवी देहलीमध्ये जहांगिरपुरी येथे हिंदूंवर मुसलमानांनी बाँब आणि गोळ्या यांनी आक्रमण करून दगडफेक केली. हे आक्रमण करणारे भंगारवाले बंगालादेशी घुसखोर होते. या प्रकरणात पोलिसांनी अन्सार नावाच्या मुसलमानाला अटक केली. अन्सार याचा खटला लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील ५ मोठे अधिवक्ता उभे राहिले. ‘जे अधिवक्ता एका खटल्याच्या सुनावणीला लाखो रुपये शुल्क घेतात, असे अधिवक्ता एका भंगारवाल्या मुसलमानाचा खटला लढण्यासाठी का सिद्ध झाले ?’, याची माहिती घेतली असता ‘जमियत उलेमा-ए-हिंद ’ या संस्थेकडून या अधिवक्त्यांना पैसे देण्यात आल्याचे समजले. प्रयागराज येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात ५६ लोक मारले गेले. या प्रकरणात ३० मुसलमानांना शिक्षा झाली. या सर्वांचा खटलाही ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडून लढवला गेला. या संस्थेकडे हा पैसा हलाल उत्पादनांच्या खरेदीतून येत आहे. ‘केस कापणे’, ‘भाजी खरेदी करणे’ यांसाठी हिंदू अन्य धर्मियांना पैसे देत आहेत, तो पैसा ‘जमियत उलेमा-ए-हिंद’पर्यंत जातो आणि हाच पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो. लव्ह जिहादच्या आरोपींना सोडवण्यासाठी या पैशांतूनच अधिवक्त्यांची फौज उभी केली जाते. अशा प्रकारे हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. अशा प्रकारे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे, असे वक्तव्य हिंदु ईकोसिस्टमचे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशीच्या सत्रात केले.
Catch live @KapilMishra_IND speak about Intellectual Terrorism and the importance of Hindu Ecosystem!#Vaishvik_HinduRashtra_Mahotsav https://t.co/xkJPCm54gn@HinduEcosystem_ pic.twitter.com/ygKKhcCgQf
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 20, 2023
नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड
रामनाथ देवस्थान – छत्तीसगडमधील वनवासी हे हिंदूच आहेत. त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि नक्षलवादी यांच्याकडून प्रचंड अत्याचार होत आहेत; परंतु त्या सर्व घटनांना प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्धी दिली जात नाही. आज वनवासी हिंदू त्यांची लढाई एकटे लढत आहेत. त्यामुळे त्यांना देशव्यापी समर्थन मिळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य छत्तीसगड येथील अधविक्त्या (सौ.) रचना नायडू यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले.
नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची युती आहे. जेथे विपुल खनिज संपत्ती आणि वनवासी आहेत, त्याच ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि नक्षलवादी यांनी बस्तान बसवले आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक कारस्थान करून हिंदु वनवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. छत्तीसगडमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठे चर्च आहे. ते वनवासींना प्रलोभने देऊन त्यांचे सर्वस्व बळकावत आहेत. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली, तरी त्यांनी बळकावलेली संपत्ती आपण परत मिळवू शकत नाही, एवढी त्यांची यंत्रणा मोठी आहे.
नक्सलवादी एवं मिशनरी इनका देशविरोधी गठबंधन – इस विषय पर संबोधित कर रही हैं @naidu_rachana
लाइव देखें : https://t.co/xkJPCm54gn#Vaishvik_HinduRashtra_Mahotsav pic.twitter.com/FUUMvvUFTf
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 20, 2023
नक्षलवाद्यांनी प्रतिदिन स्फोट घडवून छत्तीसगडमधील बस्तरची भूमी रक्तरंजित केली आहे. नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते. आज नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ मोठमोठे अधिवक्ते उभे रहातात, लेखकांकडून पुस्तके लिहिली जातात आणि पत्रकारांकडून वृत्ते दिली जातात. नक्षलवाद्यांचे जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी साटेलोटे आहे, तसेच किसान आंदोलन, शाहीन बाग अशा सर्व राष्ट्रविरोधी कारवायांनी पाठिंबा दिला आहे. वनवासींच्या अत्याचारांकडे मानवाधिकार संघटना आणि सरकार या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, असेही अधिवक्त्या (सौ.) नायडू म्हणाल्या.
नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !
नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या आयोजनात सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार काढले. महोत्सवाच्या व्यासपिठावरून मनोगत व्यक्त करतांना श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे. सर्वांचा तोंडवळा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्यावर अहंकार नाही. येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते.’’