इशरत जहाँ प्रकरणात कारवास भाेगलेले गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. त्यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंह आणि पू. आसामरामबापू यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसचे नाव न घेता ‘देश विघातक शक्तीं’नी हा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बडोदा येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले, ‘हिंदू दहशतवाद नावाचे काही अस्तित्वात नाही. पण महाराष्ट्र सरकारने साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदावरील व्यक्तीलाही तुरुंगात धाडले. एन. आय. ए. ने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले असले तरी गेली ८ वर्षे या व्यक्ती तुरुंगात आहेत, त्याचे काय ?
ते म्हणाले, ‘एकेकाळी भारताचा विस्तार अफगाण ते म्यानमार असा होता. पण आता आपण फक्त सार्क देशांचे घटक राष्ट्र आहोत. ही वेळ कोणामुळे आली ?’ आता पुन्हा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबले पाहिजे.
पू. आसारामबापू सनातन धर्माचे रक्षण करत होते, म्हणून त्यांना तरुंगात डांबण्यात आले आहे, असे ते म्हणाले. या समारंभात वंजारा यांचा उल्लेख वीर वंजारा असा करण्यात आला, तसेच त्यांनी सार्वजनिक जीवनात सक्रीय होण्याची घोषणा ही केली.
संदर्भ : पुढारी