Menu Close

विवाहासाठी राशिदकडून दलित हिंदु मुलीचे अपहरण !

शामली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या पीडितेच्या वडिलांचा आरोप

  • ‘जय भीम जय मीम’ (डॉ. बाबासोबर आंबेडकर यांचे अनुयायी आणि मुसलमान यांची युती) अशा प्रकारे घोषणाबाजी करणारे आता यावर काही का बोलत नाहीत ?
  • उत्तरप्रदेशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा असूनही तेथील धर्मांध मुसलमानांना कायद्याचे काहीच भय नसल्याचे वारंवार घडणार्‍या अशा घटना दर्शवतात. अशांना वठणीवर आणण्यासाठी जन्मठेप अथवा फाशी यांसारख्या शिक्षेची कायद्यात व्यवस्था करणे आवश्यक आहे ! -संपादक

शामली (उत्तरप्रदेश) – येथून एका १९ वर्षीय दलित हिंदु मुलीचे राशिद नावाच्या मुसलमानाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बागपत येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेली होती. ११ जूनपासून ती गायब असून राशिद या शामली येथील मुसलमानानेच तिचे अपहरण केले आहे. पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यामुळे १५ जूनच्या रात्री राशिदचे कुटुंबीय परवेझ, नदीम, शहजाद आणि नौशाद यांनी पीडितेच्या घरात घुसून त्यांना धमकावले की, ज्या प्रकारे मुलीला पळवले, तसेच त्यांच्या दुसर्‍या मुलीलाही पळवण्यात येईल. यासह मुलीच्या आईची हत्या करू.

ही धमकी दिल्याच्या प्रकरणी परवेझ आणि शहजाद यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील चौकशी करण्यात येत आहे. अशातच पीडितेच्या वडिलांनी मुसलमानांच्या भयापोटी पलायन करण्याचा संकेतही दिला आहे.

राशिद पीडितेपेक्षा दुप्पट वयाचा; ४ मुलांचा पिता ! – पीडितेच्या भावाचा आरोप

या प्रकरणी पीडितेच्या भावाने सांगितले की, राशिद हा त्याच्या बहिणीपेक्षा जवळपास दुप्पट वयाचा आहे, तसेच तो आधीपासून ४ मुलांचा पिता आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *