Menu Close

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

पुस्तक वापरणार्‍यांवर कारवाई करणार ! – शिक्षण खाते

‘औ’ या अक्षराची ओळख ‘औरंगजेब’ अशी होणे, हे औरंगजेबाचा खरा क्रूरतेने भरलेला इतिहास न शिकवल्याचा परिणाम ! -संपादक 

पणजी – कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, ‘‘ हे पुस्तक शिक्षण खात्याचे नाही आणि हे पुस्तक वापरत असलेल्या शाळांचा शोध घेतला जात आहे. हे पुस्तक वापरणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मी सर्व भागशिक्षणाधिकारी यांना पुस्तकाचा वापर करणार्‍या शाळांचा शोध घेण्याचा आदेश दिला होता; मात्र अशा शाळांचा शोध लागू शकला नाही.’’


‘भाभासुमं’चे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी विषयाला वाचा फोडली

‘औ’ अक्षरावरून औरंगजेब’ असा उल्लेख असलेल्या कोकणी उजळणी पुस्तकाचा राज्यात वापर होत असल्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी लक्षात आणून दिले.

त्यांनी ‘‘ही कसली मानसिकता ?’, ‘पुरोगामी’, ‘निधर्मी ?’ राष्ट्रभावनेला येथे किंमत नसावी’ अशा प्रकारे संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. या पुस्तकाचा काही शाळांमध्ये वापर होत असल्याची माहिती काही शिक्षकांपर्यंत पोचली होती; मात्र यावर सार्वजनिकरित्या भाष्य करण्यास कुणीही सिद्ध नव्हते. अखेर प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या विषयाला वाचा फोडली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *