हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी – ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाने भारतातील ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आणि त्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित सेक्युलरवाद्यांकडून या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला, कुठे बंदी घालण्यात आली, तर कुठे सिनेमागृहांनी दाखवण्यास नकार देण्यात आला. भारताच्या मुलींना कोणी तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचा धर्म, आई-वडील, संस्कृती, अस्तित्व सर्वकाही हिरावून घेऊन, त्यांनाच स्वतःच्या देशाच्या-धर्माच्या-कुटुंबाच्या विरोधात ‘जिहाद’ करण्यासाठी सिद्ध केले जाते, ही सामान्य गोष्ट नव्हे ! मात्र मुसलमान मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी सिनेमाला विरोध करण्यात आला. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, जे सेक्युलरवादी हा सिनेमा स्वीकारायला सिद्ध नाहीत, ते प्रत्यक्षातील लव्ह जिहादची भयानकता कशी स्वीकारतील ? ते हिंदु मुलींच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील का ? याचाच परिणाम म्हणून देशभरात लव्ह जिहादच्या घटनांनी थैमान घातले आहे. हे संकट थांबवण्यासाठी आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोहाचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल. यासमवेतच हिंदु युवतींमध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात जागृती करणे, त्यांना हिंदु धर्मशास्त्रांच्या संदर्भात शिक्षण देणे, विविध समाजघटकांमध्ये जाऊन प्रबोधन आणि संघटन करणे, त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे, ज्या हिंदु मुलींना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी घरवापसीची योजना आखणे, लव्ह जिहादच्या विरोधात बनवलेले कायदे कठोर करण्यासाठीचे प्रयत्न करणे आणि आंदोलन करणे अशा विविध उपाययोजना कराव्या लागतील, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स
आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. आम्ही या माध्यमातून युवकांना हिंदु धर्मकार्याकडे आकर्षित करत आहोत. लव्ह जिहाद आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांचे खरे स्वरूप आम्ही उघड केले. ख्रिस्त्यांच्या हिंदु धर्मविरोधी कारवाया आम्ही ‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून उघड केल्या. कलियुगातूनच सत्ययुगाची निर्मिती होणार आहे; मात्र त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. शीख हिंदूंपासून वेगळे असल्याचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) निर्माण केले जात आहे. याचे स्वरूपही आम्ही चॅनलद्वारे उघड केले. ‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून हिंदूंना दिशादर्शन केले जात आहे.
#Vaishvik_HinduRashtra_Mahotsav में हिन्दू मूल्याेंकी रक्षा हेतु @sangamtalks के कार्य के विषय में बताती हुई @TanyaBrahmvadni
लाइव देखें : https://t.co/xkJPCm54gn pic.twitter.com/Q4vq61rNV6
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 21, 2023
गोवा येथील शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेण्यास भाग पाडणार्या हिंदुत्वनिष्ठांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !
गोवा राज्यातील कळंगुट येथे शिवप्रेमींनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी कळंगुट ग्रामपंचायतीने २ दिवसांपूर्वी आदेश काढला होता. या विरोधात शिवस्वराज्य संघटना आणि स्थानिक शिवप्रेमी यांनी तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एकत्रित येऊन शेकडो शिवप्रेमींनी याचा निषेध करत आदेश मागे घेण्याची मागणी केली. शिवप्रेमींच्या या आंदोलनामुळे शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश ग्रामपंचायतीने मागे घेतला, तसेच याविषयी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी क्षमायाचना केली. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मठकर आणि उपाध्यक्ष श्री. प्रज्योत कळंगुटकर यांचा सत्कार सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आला. शिवस्वराज्य संघटनेचे सर्वश्री सुरेश मयेकर, सिद्धेश गोवेकर आणि प्रसाद शिरोडकर या वेळी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला.
युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान
रामनाथी – ‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की…’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जर जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत, तर आपण काहीतरी मोठी मागणी केली पाहिजे, असे मत जयपूर, राजस्थान येथील ‘जम्बू टॉक्स’ या ‘यू-ट्युब वाहिनी’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ६ व्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,
‘‘सध्याच्या चीनमध्ये मेरू (सुमेरू) पर्वत आहे आणि तो या विश्वाचा मध्य आहे’, असे म्हटले जाते. ही गोष्ट हिंदूंना किती वेळा सांगितली गेली ? आमच्या वाहिनीने ‘क्यों छिपाया जम्बूद्वीप ?’ असा कार्यक्रम केला. आपण अखंड भारताची गोष्ट का करतो ? जम्बू द्वीपाविषयी का बोलत नाही ? आपण काश्मीरला महर्षि कश्यप यांची भूमी म्हणतो, तर ‘कॅस्पियन’ समुद्राला कश्यप सागर का नाही म्हणत ? हा तोच कश्यप समुद्र आहे, जेथून पुढे मध्य पूर्व आणि अन्य देश आहेत. जम्बूद्वीपविषयी आम्ही केलेला कार्यक्रम २ लाख लोकांनी पाहिला. यावरून भारताच्या युवकांना आपल्या इतिहासाविषयी जिज्ञासा आहे, हे लक्षात आले. युवकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. आदि शंकराचार्यांनी म्हटले होते की, मी शंख वाजवणार आहे आणि हा शंखध्वनी जेथे जेथे पोहोचेल, तो प्रदेश सनातन राहील. भारत कधीही गुलाम राहिलेला नाही, उलट आपला समाज संघर्षशील राहिला आहे. असे असले, तरी आपल्याला ‘भारत गुलाम देश होता’, असे शिकवण्यात आले आणि आपण ते मान्य केले. अर्जुन दिग्विजयी मोहिमेवर निघाला होता. तो आजच्या सायबेरियापर्यंतही गेला होता. मग आपल्याला हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून भौगोलिक इतिहास शिकवण्यापासून कोणी थांबवले आहे ? आम्ही जेव्हापासून ‘जम्बू टॉक्स’ ही वाहिनी चालू केली, तेव्हापासून आम्ही केवळ अशा विषयांवर २०० कार्यक्रम केले. यासह अन्य विषय मिळून आतापर्यंत ७०० भाग केले आहेत. आमचा हा प्रवास थांबणार नसून सतत चालू रहाणार आहे. कोणत्याही कार्याचा प्रारंभ सात्त्विक भावाने केल्यास आपल्या आतील आणि चराचरातील श्रीकृष्ण साहाय्य करतो. भगवंताचे साहाय्य लाभल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.’’
अधिवक्ता म्हणून धर्मकार्य करतांना भगवंतच कार्य करून घेत आहे ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, हिंदु विधीज्ञ परिषद, देहली
रामनाथी – श्रीकृष्ण जन्मभूमीच्या खटल्यात अधिवक्ता म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मथुरा येथे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा खटला लढवत आहे. त्या वेळी विरोधी पक्षाकडून ४ वरिष्ठ अधिवक्ता होते; मात्र मला न घाबरता हिंदूंची भूमिका मांडता आली. या प्रसंगात भगवंताचा आशीर्वाद समवेत असल्याचे जाणवत होते. या खटल्याचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागला. देहली येथे हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी अधिवक्ते पुढे येत आहेत, ही भगवंताचीच लीला आहे. ईश्वरच सर्व करतो आणि आपल्याला आनंद देतो, असे भावपूर्ण उद्गार हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली येथील सदस्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी काढले. त्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
रामनाथी – हिंदु धर्म दुराचाराला अधर्म मानतो. विश्वकल्याणाच्या भावनेने काम करणे हा धर्म आहे. योग्य कृतीलाच धर्म म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अन्यांना पिडा देणे हा अधर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील मुख्य अडचण ही आहे की, अभिव्यक्ती स्वतंत्र्य कि स्वैराचार ? हे नेमके निश्चित कोण निश्चित करणार ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कोणते ? याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे. यामध्ये डाव्या शक्ती आघाडीवर आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनावश्यक प्रसार करण्यात आला आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य साम्यवादी, डावे, नक्षलवादी आदी राष्ट्रविरोधी शक्तींच्या बाजूने झुकलेले आहे. राज्यघटनेतील कलम १९ (१ ए) नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; मात्र १९ (२) नुसार भारताच्या अखंडत्वाच्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रतिबंधही घालण्यात आला आहे. सद्यःस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयीनुसार वापरले जात आहे. शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात, असे उद्गार सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.