भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल
रामनाथी – सद्यःस्थितीत भारतात ६ कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर खोट्या ओळखपत्रांच्या आधारे भारतात रहात असूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी शासनकर्ते या घुसखोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन याविषयी सर्वेक्षण करायला हवे. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांमुळे आसाम, मिझोरम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ८ सहस्र गावे मुसलमानबहुल झाली आहेत. या सर्व गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत. या घुसखोर मुसलमानांमुळे भारताच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ‘लँड जिहाद’, ‘पॉप्युलेशन (लोकसंख्या) जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांद्वारे या घुसखोर मुसलमानांनी भारताची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणली आहे. ज्या वेळी भारत स्वातंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे. राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे, असे उद्गार बंगाल येथील ‘अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्थे’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
The time is ripe for deleting the word ‘Secular’ from the Constitution.
– Adv. Joydeep Mukherjee (General Secretary, All India Legal Aid Forum, Hooghly, Bengal)The solution to the rising atrocities against the Hindus in Bengal is establishment of Hindu Rashtra!
Join us :… pic.twitter.com/Ehi72fSnVj
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 23, 2023
मंदिरांमध्ये प्रवेश करतांना संस्कृतीनुसार वस्त्रे परिधान करायला हवीत ! – डिगंबर महाले, अध्यक्ष, श्री मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर (जिल्हा जळगाव)
मंगळग्रह मंदिरामध्ये ‘व्हिआय्पी’ प्रवेशपद्धत नाही. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या नावाचा एकही फलक नाही. मंदिरातील सर्वांना आम्ही ‘सेवेकरी’ असे परिचयपत्र दिले आहे. मंदिरांसाठीची वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. या वेळी काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो. मंदिरांमध्ये प्रवेश करतांना आपल्या संस्कृतीनुसार वस्त्रे परिधान करायला हवीत, असे उद्गार अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘श्री मंगळग्रह सेवा संस्थे’चे अध्यक्ष श्री. डिगंबर महाले यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !
१. सेवाभाव आम्ही हिंदु जनजागृती समितीकडून शकलो.
२. सनातनच्या साधकांमध्येही नम्रता आणि सेवाभाव पहायला मिळतो.’
३. सनातनच्या साधकांमध्येही नम्रता आणि सेवाभाव पहायला मिळतो.’
– श्री. डिगंबर महाले, अध्यक्ष, श्री मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर (जिल्हा जळगाव)
तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे ! – पाळा संतोष कुमार, संस्थापक अध्यक्ष, हिंदू येलूच्ची पेरवाई, तमिळनाडू
नवीन संसदेमध्ये स्थापन करण्यात आलेले ‘सेंगोल’ हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्ये सेंगोलची स्थापना हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे. हिंदु धर्मप्रसाराचे महान कार्य या भूमीतून झाले आहे. सद्यःस्थितीत मात्र तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवाया वाढत आहेत. हे आतंकवादी अफगाणिस्तानच्या आतंकवाद्यांशी जोडलेले आहेत. तमिळनाडू हा आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे. मागील काही वर्षांत तमिळनाडूमध्ये आतंकवाद्यांनी बाँम्बस्फोट केले. मागील काही वर्षांत धर्मांधांनी तमिळनाडूमधील १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. तमिळनाडू सरकार आणि काही राष्ट्रीय नेते या धर्मांधांच्या कारवायांविषयी एकही शब्द बोलत नाहीत. हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे आमच्या संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार तमिळनाडू येथील ‘हिंदू येलूच्ची पेरवाई’ (हिंदु युवा जागृत मंच) या संघटनेचे अध्यक्ष पाळा संतोष कुमार यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) केंद्रशासनाच्या अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून, तसेच श्रीकृष्णाचे चित्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.