झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – हरिश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवा सेना, मध्यप्रदेश
रामनाथी – आपल्याला झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन कारायचे आहे. सर्व हिंदू ध्वनीक्षेपकावरून होणार्या ५ वेळेच्या अजानमुळे त्रस्त आहेत. त्याप्रमाणे आम्हीही त्रस्त होतो. ते थांबवणे आपल्या आवाक्यात नव्हते; म्हणून त्याला मोठा पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानुसार आम्ही सर्व हिंदूंनी मिळून शहरामध्ये एक ८५ फूट उंच ‘श्रीराम टॉवर’ उभारला आणि त्यावर २५ ध्वनीक्षेपक लावले. तसेच त्यावरून सकाळ-संध्याकाळ हनुमान चालिसा लावण्यात येते. यातून हिंदू एकत्र आले, तर काय होऊ शकते, हे लक्षात आले. ‘श्रीराम टॉवर’वरून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांनी ‘श्रीराम टॉवर’ची मागणी केली. एका गावाच्या सरपंचांनी १ मासाच्या आत त्यांच्या गावात टॉवर उभारण्याचा निश्चय केला. हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदू संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंने सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू केले, असे उद्गार मध्यप्रदेश येथील ‘श्रीराम युवा सेने’चे प्रदेश महामंत्री श्री. हरिश जोशी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.
श्री. हरिश जोशी पुढे म्हणाले,
‘‘वर्ष २०१५ मध्ये हिंदु जनजागृती समितीशी संपर्क झाला. त्या वेळेच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये मी आमदार राजासिंह यांचे भाषण ऐकले. त्यानंतर मी कट्टर हिंदु बनण्याचे ठरवले. आमदार राजासिंह आमचे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आम्हीही गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कार्य करतो. हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने माझ्यावर आणि माझ्या भावावर विरोधकांनी आक्रमणे केली; पण ईश्वराच्या कृपेने त्यातून आमचे रक्षण झाले.’’
बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी
रामनाथी – आमच्या मुझफ्फरपूर शहराचे नाव मला नेहमी खटकायचे. त्यामुळे वर्ष १९८० मध्ये ते पालटण्यासाठी काही समविचारी मित्र आणि संस्था यांची एक बैठक घेतली. त्यात शहराचे नाव पालटायचे ठरवले. मुझफ्फरपूर हे लिची या फळांसाठी प्रसिद्ध आहे. शहराची ६ लाख लोकसंख्या असून त्यात ५० सहस्र मुसलमान आहेत. तेथे अनेक पशूवधगृह आहेत. ते बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील प्रशासन आणि पोलीस यांच्याशी पशूवधगृहांची मिलीभगत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहरात अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. त्या नावावर तेथे रात्रीच्या वेळी गोमांसाचे ‘पॅकिंग’ केली जाते. आम्ही केंद्र सरकारच्या अधिकार्यांचे साहाय्य घेऊन एका रात्रीत ५०० टन गोमांस पकडले. हे सर्व कार्य आमच्या १५ ते २० संघटनांच्या समन्वय समितीकडून केले जाते. गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्या ठिकाणी चालू करण्यात येते, असे संतप्त उद्गार उत्तरप्रदेशातील ‘आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी’चे संस्थापक आचार्य चंद्र किशोर पाराशर यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करत होते.
ते पुढे म्हणाले,
‘‘राष्ट्रवादी विचारांच्या साहित्यिकांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आमच्या समन्वय समितीने प्रसिद्ध साहित्यिक दिनकर यांच्या नावाने अकादमी स्थापन केली. या अकादमीच्या वतीने प्रतिवर्षी ३ दिवस संमेलनाचे आयोजन केले जाते. अलीकडे बिहारच्या नौबतपूरमध्ये बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला बिहार शासनाकडून विरोध झाला. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमासाठी येथील शेतकर्यांनी त्यांची पिक असलेली १ सहस्र ५०० एकर भूमी सपाट करून दिली.’’
हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्याकडून गौरव !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्या आय्.टी. सेलचे समन्वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांचा गौरव केला.