नाचणखेडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा
जळगाव : ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून या धर्मांधांनी राष्ट्र आणि धर्म यांविरुद्ध एक अघोषित छुपे युद्धच पुकारलेले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १ लक्ष २० सहस्र मुली लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. या जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी नाचणखेडा येथे १७ मे या दिवशी झालेल्या धर्मजागृती सभेत केले. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मजागृती सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. श्रेयस पिसोळकर, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेच्या प्रारंभी शंखनाद झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. समितीचे श्री. सचिन वैद्य यांनी समितीचे कार्य मांडले. सभेचे सूत्रसंचालन श्री. नीलेश तांबट आणि कु. तेजस्विनी तांबट यांनी केले. या धर्मजागृती सभेला ८०० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.
मंदिरांचे महत्त्व लक्षात घेऊन गावागावांत मंदिर रक्षणासाठी तरुणांची पथके निर्माण करा ! – प्रशांत जुवेकर
पंढरपूरच्या विठ्ठलमंदिर समितीने मंदिराच्या गोशाळेतील गायी कसायांना विकून पैसा कमावला, मंदिराच्या १२०० एकर भूमिपैकी ७०० एकर भूमी गहाळ झाली आहे. आता सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत मंदिरातील सोने लुटणे चालू आहे. जळगाव जामोद येथे मंदिर सुरुंग लावून उडवून देण्यात आले. यासाठी मंदिरांच्या रक्षणासाठी गावागावांत मंदिर रक्षणासाठी तरुणांची पथके निर्माण करा !
जात, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून धर्मरक्षणासाठी एकत्र या ! – श्रेयस पिसोळकर
देशद्रोही आणि आतंकवादी यांचे समर्थन देशामध्ये केले जात आहे. देशाच्या आर्थिक राजधानीवर आक्रमण करणार्या याकूब मेमनला वाचवण्यासाठी ३४ जण पत्र लिहितात, त्याच्या अंत्ययात्रेला १०,००० धर्मांध जमतात म्हणजे हे भारतात रहातात मात्र निष्ठा त्या आतंकवाद्यांवर आहे. पुढे हेच आपल्यावर चालून येतील, तेव्हा ते हा ‘बारी’, हा ‘पाटील’, हा ‘माळी’, हा ‘कोळी’ असा विचार न करता काफीर म्हणून मारतील म्हणून भेदभाव विसरून हिंदु म्हणून एकत्र या !
क्षणचित्रे :
१. या धर्मसभेचे आयोजन गावातील धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केले. २० मुलांनी ८ गावांमध्ये पत्रकांचे वितरण, उद्घोषणा करून या सभेचा प्रसार केला.
२. ग्रामीण भाग असल्याने व्यासपिठाचे साहित्य उपलब्ध नव्हते, तेव्हा मुलांनी २ ट्रॅक्टरच्या ट्रॉली जोडून व्यासपीठ तयार केले होते.
३. २-३ दिवसांत प्रसार करूनही ८०० हून अधिक धर्माभिमानी होते.
४. धर्मांधाने सभेच्या वेळीच एका हिंदूंच्या गल्लीत सभेच्या वेळीच टँकर आणून लावला. गावामध्ये १५ दिवस पाणी नव्हते, तेव्हा तेथील सर्व हिंदू पाणी भरायला गेले. धर्मांधांनेे सभेला कोणी जाऊ नये यासाठी असे षड्यंत्र रचले अशी गावकर्यांमध्ये चर्चा चालू होती. (धर्मांधांचा कावेबाजपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. या धर्मसभेला ५० प्रतिशत महिलांची उपस्थिती होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात