Menu Close

‘पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेवर चर्चा करा – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिला सल्ला !

भारताच्या अंतर्गत सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याच देशाला आणि त्यांच्या प्रमुखांना नाही, हे ओबामा यांना ठाऊक नाही का ? ‘पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याशी अमेरिकेतील अश्‍वेतांवरील अत्याचारांविषयी चर्चा करावी’, असे भारताने कधी म्हटले आहे का ? – संपादक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (डावीकडे) भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेच्या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बायडेन यांच्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा यांनी या दोघांच्या भेटीपूर्वी दिला होता. ‘माझी मोदी यांच्याशी भेट झाली असती, तर अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे सूत्र उपस्थित केले असते’, असेही ते म्हणाले. बायडेन आणि मोदी यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत आतंकवादाविषयी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले आहे.

हिंदु आणि मुसलमान यांच्यातील फूट त्यांच्या अन् भारताच्या विरोधात असेल !

बराक ओबामा यांनी ‘सी.एन्.एन्.’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत; मात्र भारतात मुसलमानांची सुरक्षा, हा चिंतेचा विषय आहे. भारत हा हिंदु बहुसंख्यांचा देश आहे; मात्र तेथील मुसलमान अल्पसंख्यांकांची सुरक्षा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे.

(सौजन्य : Hindustan Times) 

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणे सोपे नाही !

बराक ओबामा पुढे म्हणाले की, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणे, ही सोपी गोष्ट नाही. मी जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, तेव्हा मी लोकांना भेटत होतो. मी लोकांशी चर्चा करत होतो. त्यांना मी विचारत असे ‘आपले सरकार, आपला पक्ष हा लोकशाही पाळतो आहे’, असे तुम्हाला वाटते का ?’ अनेकदा या प्रश्‍नाचे उत्तर लोक ‘नाही’, असेही द्यायचे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला या आणि अशा अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात. यामध्ये वित्तीय सूत्रेही समाविष्ट आहेत.

भारतातील मुसलमानांचा कळवळा येणार्‍या बराक ओबामा यांची खरा चेहरा !

ओबामा राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी एका वर्षांत सीरिया, इराक, अफगानिस्तान, लिबिया, येमेन, सोमालिया आणि पाकिस्तान या ७ इस्लामी देशांवर २६ सहस्र १७१ बाँब फेकले होते. यांत लाखो मुसलमानांचा मृत्यू झाला होता. ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडून अन्य देशांवर सर्वाधिक ड्रोन आक्रमणे करण्यात आली. अमेरिकेचे सैनिक ७० देशांत तैनात होते. यानंतरही ओबामा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *