Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेशातील शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पालट

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे. यात पंडित दीनदयाळ उपाध्याय, महावीर जैन, पंडित मदन मोहन मालवीय, अरविंद घोष, नाना साहेब पेशवे आदींचा समावेश आहे.

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाचा हा अभ्यासक्रम राज्यातील २७ सहस्रांहून अधिक शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे १ कोटीहून अधिक विद्यार्थी शिकणार आहेत.

१. इयत्ता ९ वीतील विद्यार्थी चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा, वीर कुंवर सिंह, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, श्रीनिवास रामानुजन, जगदीश चंद्र बोस आदींची जीवनगाथा शिकणार आहेत.

२. इयत्ता १० वीतील विद्यार्थी मंगल पांडे, सुखदेव, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, खुदीराम बोस, स्वामी विवेकानंद आदींची जीवनगाथा शिकतील.

३. इयत्ता ११ वीचे विद्यार्थी राम प्रसाद बिस्मल, भगतसिंह, सरदार वल्लभ भाई पटेल,  महर्षि पतंजलि, शल्य चिकित्सक सुश्रुत, डॉ. होमी जहांगीर भाभा आदींविषयीचे धडे शिकणार आहेत.

४. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना रामकृष्ण परमहंस, गणेश शंकर विद्यार्थी, राजगुरू, रवींद्रनाथ टागोर, लाल बहादुर शास्त्री, राणी लक्ष्मी बाई, महाराणा प्रताप, बंकिम चंद्र चटर्जी, आदि शंकराचार्य, गुरु नानक देव, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रामानुजाचार्य, पाणिनी, आर्यभट्ट आणि सी.व्ही. रामन यांचे धडे शिकवण्यात येणार आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *