मनोहर यांच्या अमानुष हत्येचे प्रकरण
- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्प आहे. काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
- जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही !- संपादक
चंबा (हिमाचल प्रदेश) – येथील संघणी भागात काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी मनोहर नावाच्या हिंदु तरुणाची हत्या करून त्याच्या शरिराचे ८ तुकडे करून ते नाल्यात फेकले होते. मुसलमान तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे मनोहर यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथील वातावरण तणावपूर्ण असून संतप्त नागरिकांनी एका आरोपीचे घर जाळले. आता येथील हिंदु संघटनांनी रस्त्यावर उतरून जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा, अन्यथा ३० दिवसानंतर जे होईल, त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल’, अशी चेतावणी दिली. संघणी हत्याकांड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जागरण मंच, ब्राह्मण प्रतिनिधी सभा, सिप्पी कल्याण सभा, वाल्मीकि सभा आणि व्यापार मंडळ चंबा या संघटनांचे कार्यकर्ते अन् सदस्य सहभागी झाले आहे.
Himachal Pradesh: Hindus protest in Chamba over Manohar Lal’s brutal murder, give ultimatum of 30 days to jihadis to leave the statehttps://t.co/5cROgJwxwG
— OpIndia.com (@OpIndia_com) June 23, 2023
१. या संघटनांनी मनोहर यांच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या वेळी पोलीस आणि प्रशासन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येथील चौहरा धरणाच्या ठिकाणी पोलिसांनी अडथळे (बॅरिकेडिंग) ठेवले होते. यावरून ‘राष्ट्रीय देवभूमी पक्षा’चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाला. पोलिसांनी जमावबंदी लागू करत आंदोलनकर्त्यांना पुढे जाऊ देण्यास विरोध केला. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या आंदोलन केले.
२. आंदोलनातील कार्यकर्ते कमल गौतम यांनी सांगितले की, मनोहर यांची अमानुष हत्या, हे हिमाचल प्रदेशातील हिंदूंवर आक्रमण आहे. या हत्येमागील षड्यंत्राची चौकशी करून सत्य समोर आणावे. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे.
३. राष्ट्रीय देवभूमी पक्षाचे प्रमुख रुमित ठाकूर यांनी ‘मनोहर यांच्या हत्येतील आरोपींची नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत’, याकडे लक्ष वेधले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात