Menu Close

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

स्वतःच्या व्यवसायाचा वापर हिंदूंच्या धर्मांतरासाठी करणारे धर्मांध डॉक्टर. अशा डॉक्टरांचा परवाना रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक 

मुलाची जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉ. जावेद खान याने त्याची केली सुंता !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका हिंदु मुलाची बळजोरीने सुंता केली. मुसलमान डॉक्टरच्या या कुकृत्याविषयी कुटुंबियांना समजताच एकच खळबळ उडाली. हिंदु संघटनांनीही या घटनेचा निषेध केला. पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. बरेलीतील संजयनगर येथील रहिवासी हरिमोहन यादव यांचा ३ वर्षांचा मुलगा स्पष्ट बोलू शकत नव्हता. यामुळे यादव अतिशय अस्वस्थ होते. त्यांनी मुलाला जिभेची शस्त्रक्रिया करण्यासाठी डेलापीर येथील खाजगी रुग्णालयात भरती केले.

२. त्यांच्या मुलाची जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉ. जावेद खान याने त्याची सुंता केली. ‘डॉक्टरांनी हे सर्व जाणूनबुजून केले आणि माझ्या मुलाला मुसलमान बनवले’, असा आरोप हरिमोहन यांनी केला आहे.

३. रुग्णालय प्रशासनाने पीडित मुलाच्या पालकांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकला आहे. या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *