खटल्यावरील सुनावणीसाठी बेंगळुरू पोलिसांनी कोच्चि येथे आणले होते !
- अशा मानसिकतेचे लोक असल्यास भविष्यात पुनःपुन्हा बाँबस्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये !
- या घटनेविषयी काँग्रेस, माकप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक
कोच्चि (केरळ) – अनेक बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटकेत असणारा जिहादी आतंकवादी अब्दुल नसीर मदनी याला बेंगळुरू पोलिसांनी कोच्चि येथे आणले असता मोठ्या संख्येने उपस्थित मुसलमानांनी त्याचे भव्य स्वागत केले. प्रसारमाध्यमांकडूनही त्याला एका वलयांकित व्यक्तीप्रमाणे महत्त्व देत या घटनेचे वार्तांकन करण्यात आले. मदनी याला खटल्याच्या प्रकरणात बेंगळुरू येथून कोच्चि येथे आणण्यात आले होते. माजी पोलीस अधिकारी भास्कर राव यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधील बोलतांना ‘एका आतंकवाद्याचा अशा प्रकारे स्वागत होणे लज्जास्पद आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Kerala: Muslims give a heroic reception to Banglore, Coimbatore blasts accused, Abdul Nasser Madani, with alleged links to LeThttps://t.co/YX9AExbwwQ
— OpIndia.com (@OpIndia_com) June 28, 2023
मदनी हा केरळमधील ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षा’चा अध्यक्ष आहे. कोईंबतूर येथे वर्ष १९९८ आणि बेंगळुरू येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मालिकांमध्ये त्याचा हात असल्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. या स्फोटांमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात