Menu Close

महाराष्ट्र : ‘बकरी ईद’ निमित्त लावलेल्या फलकावर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख !

  • औरंगजेबाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करणे, अफझलखानवधाच्या चित्राला विरोध करणे, ‘लव्ह पाकिस्तान’ लिहिलेले फुगे विकले जाणे, त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धर्मांधांनी घुसण्याचा प्रयत्न करणे आणि आता नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख करणे, या सर्व घडामोडी म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे ! ‘असे प्रकार म्हणजे हिंदूंवर वर्चस्व गाजवून त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ?
  • अशा घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलीस अशा घटनांची पाळेमुळे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करत नसल्यानेच धर्मांधांचे फावत आहे !-संपादक

नाशिक (महाराष्ट्र) – २९ जून या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकावर ‘मुहम्मद सुफिखान रजा फ्रेंड सर्कल गुलशनाबाद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक शहराचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ असा केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सौजन्य: ABP MAJHA

मोगलकाळात नाशिक शहराचे नाव ‘गुलशनाबाद’ होते. त्यानंतर पेशवाईच्या काळात ‘गुलशनाबाद’चे नामकरण ‘नाशिक’ असे करण्यात आले; मात्र त्यानंतर आता अचानक नाशिकचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून या कृतीचा निषेध नोंदवला जात आहे.

‘गुलशनाबाद’चा फलक लावणार्‍यांवर कारवाई करणार ! – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक –  ‘गुलशनाबाद’चा फलक लावणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन नाशिक जिल्ह्याचे दादा भुसे यांनी दिले. भुसे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची बैठक ३० जून या दिवशी येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, फलकाविषयीची गोष्ट माझ्याही कानावर आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *