Menu Close

मुसलमान शरणार्थींमुळे नेदरलँड्स विनाशाच्या उंबरठ्यावर !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांनी व्यक्त केला संताप !

गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – मुसलमान शरणार्थींमुळे नेदरलँड्स विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्यामुळे येथील लक्षावधी नागरिकांना भयावह त्रास सहन करावा लागत आहे. इराण येथून आलेल्या एका शरणार्थी मुसलमानाच्या विरोधात काल खटला चालू होता. त्याला त्याच्या देशात पुन्हा पाठवण्यावर तिसर्‍यांदा सुनावणी चालू होती. या इराणी शरणार्थीने एका शरणार्थी केंद्रावर काम करणार्‍या २ डच नागरिकांवर उकळते तेल टाकल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे.

जर या आरोपीला पहिल्या प्रकरणाच्या वेळीच परत पाठवले असते, तर असे झाले नसते. हे नेदरलँड्स सरकारचे अपयश आहे. हे अत्यंत संतापजनक असून शरणार्थींमुळे ही परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे वक्तव्य येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

विल्डर्स पुढे म्हणाले की,

मुसलमान शरणार्थी रस्त्यावरच शौच करतात. एका शरणार्थीने एका ११ वर्षीय डच मुलीला त्याची जननेंद्रिये दाखवली. हे लोक सार्वजनिक ठिकाणी डच मुलींसमोर हस्तमैथुन करत आहेत. महिलांशी गैरवर्तन करणे, शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास देण्यासारखे प्रकार वाढले आहेत. शरणार्थींकडून ‘सुपरमार्केट’मधील ‘कॅशिअर’ना ‘गळा कापू’ अशा प्रकारे खुणावून घाबरवले जाते आणि तेथील वस्तू फुकट लूटल्या जात आहेत. अशा सर्व प्रकारांमुळे डच नागरिक रात्री बाहेर पडू शकत नाहीत !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *