मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साही वातावरणात संपन्न झाले. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ज्याप्रमाणे रात्रीनंतर होणारा सूर्योदय कुणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार होणारी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापनाही कुणी रोखू शकत नाही. काळही त्याच दिशेने जात आहे. त्यामुळे या काळात आपण जर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले, तर काळानुसार धर्मकार्य होऊन त्यातून आपली साधना होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चय करा, असे आवाहन मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना केले. मोठ्या संख्येने देशभरातील जिज्ञासूंनी या महोत्सवांचा लाभ घेतला.
४ भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’
यंदाच्या वर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या ४ भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात