Menu Close

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर मारली लाथ !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक 

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ३ जुलै या दिवशी इम्रान आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी राजेंद्र मौर्या यांच्या कुटुंबावर आक्रमण केले. धर्मांधांनी या कुटुंबातील गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारली, तर अन्य महिलांचे कपडे फाडले. या वेळी या कुटुंबियांकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. म्रान आणि त्याच्या साथीदारांनी मंगळसूत्र चोरल्याचा आरोप या कुटुंबातील महिलांनी केला आहे.

डेहराडून येथे वासनांध मुसलमानांनी काढली हिंदु तरुणीची छेड  : हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांध ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा !

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील घटनेत वासनांध मुसलमानांकडून एका हिंदु तरुणीची छेड काढण्यात आली. यासहिंदूंनी विरोध केल्यावर मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यात आल्या.

येथील सहारनपूर मार्गावरून ही तरुणी घरी जात असतांना २ मुसलमान तरुणांनी तिची छेड काढली. त्यानंतर ते मशिदीमध्ये पळाले. या छेडछाडीची माहिती तरुणीने कुटुंबियांना दिल्यावर ते हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी गेले. ते मशिदीजवळ पोचले असता मुसलमानांनीही तेथे गर्दी केली आणि ते घोषणाबाजी करू लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीस छेड काढणार्‍या तरुणांचा शोध घेत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *