सातारा – खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे असलेल्या एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या सीमेत करण्यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्यात आले. वन विभागाकडून राबवलेल्या या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सातारा-पुसेगाव रस्त्यावरील वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याची नोंद घेत शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात वन विभागाच्या अधिकार्यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात