Menu Close

इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य, समजावल्यावर केली घरवापसी !

  • राजकोट (गुजरात) येथील युवक अडकला लव्ह जिहादच्या जाळ्यात !

  • आशीष गोस्वामी बनला शेख महंमद !

  • हिंदुत्वनिष्ठांनी पुष्कळ समजावल्यावर केली घरवापसी !

प्रेमात अंध होऊन स्वधर्म सोडल्याच्या हिंदूंच्या संदर्भातील अनेक घटना प्रतिदिन घडत आहेत. अशा घटना कधी ख्रिस्ती अथवा मुसलमान यांच्यासंदर्भात ऐकायला तरी मिळतात का ? धर्मशिक्षण आणि धर्माभिमान शून्य हिंदूंसाठी हे लज्जास्पद ! -संपादक

राजकोट (गुजरात) – इंस्टाग्रामच्या माध्यमातून बांगलादेशातील एका मुसलमान मुलीने येथील आशीष गोस्वामी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले. मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याने इस्लाम स्वीकारून तो मशिदीत राहू लागला. या प्रकाराविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळताच त्यांनी त्याला पुष्कळ समजावले आणि शेवटी त्याने घरवापसी केली. (घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

राजकोट जिल्ह्यातील जेतपूर येथील ही घटना असून आशीष काही मासांपासून बांगलादेशातील मुसलमान मुलीच्या संपर्कात होता. तिच्या सांगण्यावरून त्याने जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहाण्यास आरंभ केला. त्याने इस्लाम स्वीकारून स्वत:चे नाव पालटून शेख महंमद अलसामी ठेवले. त्यानंतर तो घर सोडून मशिदीत राहू लागला आणि ५ वेळा नमाजपठणही करू लागला. ५ जुलै या दिवशी स्थानिक मुसलमानांनी त्याची सुंता करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले. आशीषच्या कुटुंबियांना हे कळताच तेही रुग्णालयात पोचले आणि त्यांनी त्याची सुंता होण्यापासून रोखले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ही माहिती मिळताच अनेक हिंदुत्वनिष्ठांनी आशीषचे घर गाठले. ५ जुलैच्या रात्री जेतपूरमधील नरसिंह मंदिराचे महंत कन्हैयानंद महाराज यांच्या उपस्थितीत आशीषला २ घंटे त्याच्याकडून होत असलेल्या चुकीविषयी समजावण्यात आले. त्याने मान्य केले की, तो धर्मांध मुसलमानांच्या बोलण्याला भूलला होता. या वेळी महंतांनी त्याला टिळा लावून त्याची घरवापसी केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *