कराड : देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांचीही आहुती दिली, त्यांना स्वतंत्र भारतात आतंकवादी म्हणणे, हा क्रांतीकारकांचा अक्षम्य अवमानच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केले
येथील शाहू चौकात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकदा आंदोलन, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे ६० हून अधिक कार्यकर्ते आणि साधक सहभागी झाले होते.
श्री. हेमंत सोनवणे पुढे म्हणाले की, आजवर केवळ गांधी-नेहरूंचा अवमान करणार्यांवर त्वरित गुन्हे प्रविष्ट करण्यात येतात. मग हुतात्मा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतीकारकांचा अवमान करणार्यांवर आजवर अशा प्रकारे गुन्हे का प्रविष्ट होत नाहीत?
धार्मिक प्रथा आणि परंपरा यांविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ धर्मपिठाला – सौ. नीला देसाई
हिंदूंनी स्त्री-पुरुष समानतेच्या पुष्कळ पुढे जाऊन स्त्रियांना देवतांच्या रूपात पुजले आहे. त्यामुळे ‘हिंदूंच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही’, हा आरोपच खोटा आहे. ‘महिलांनी मंदिरांच्या गर्भगृहात प्रवेश करणे’, हा पूर्णतः धार्मिक विषय असल्याने याविषयी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार केवळ धर्मपिठाला आहे, असे प्रतिपादन सौ. नीला देसाई यांनी शेवटी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात