Menu Close

सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी हिंदु महिलेवर रात्रभर केला सामूहिक बलात्कार !

अन्य एका प्रकरणात अवामी लीगच्या नेत्याने हिंदु दुकानदारावर केले आक्रमण !

बांगलादेशमधील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच हिंदूंवर अत्याचार करत असतांना भारत सरकार हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र बांगलादेश सरकारकडे उपस्थित का करत नाही ? -संपादक

अवामी लीगचे चालिक, हसनुल आणि सैफुल हे तीन बलात्कारी

ढाका (बांगलादेश) – देशात सत्ताधारी असलेल्या अवामी लीगच्या सिल्हट जिल्ह्यातील मौलवीबाजार येथील ३ स्थानिक नेत्यांनी एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अवामी लीगचे चालिक, हसनुल आणि सैफुल अशी तिघा बलात्कार्‍यांची नावे असून त्यांनी पीडितेवर रात्रभर बलात्कार केला, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने तिच्या ट्विटर खात्यावरून दिली. ट्वीटसह त्यांनी या घटनेविषयी माहिती देणारा व्हिडिओही प्रसारित केला आहे.

खालील लिंकवर क्लिक करा –

https://twitter.com/BDHindu71/status/1676849229007060992

अन्य एका घटनेमध्ये ढाकाजवळ असलेल्या अशुलिया येथील स्थानिक अवामी लीगचा नेता शाहिदुर रहमान याने बाबुल चंद्र शील या हिंदु दुकानदारावर आक्रमण केले. जेव्हा बाबुलने शाहीदुरकडे उसने घेतलेल्या पैशांची मागणी केली, तेव्हा शाहिदुरने हे आक्रमण केले. घायाळ झालेल्या बाबुल याला स्थानिक हिंदूंनी रुग्णालयात भरती केले. या घटनेची माहिती ‘वीर बंगाली’ नावाच्या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. ‘मुस्लिम लीगने त्याचे नाव पालटून ‘अवामी (सार्वजनिक) लीग’ केले; परंतु त्याच्या विचारसरणीत कोणताच पालट झालेला नाही’, असे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *