Menu Close

भारत सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील ! – श्री. अनिल धीर, अभ्यासक

विशेष संवाद : ‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ?’

एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेली 30 ते 40 वर्षांपासूनची तयारी आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम फ्रान्समधील नागरिक भोगत आहेत. युरोपमधील अन्य देश आता सतर्क झाले असून फ्रान्समध्ये जे घडले ते कुठेही घडू शकते. आज भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसवले जात आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या घुसखोरांविषयी भारत सरकराने कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील, असा इशारा ओडिशा, भुवनेश्वर येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक तथा अभ्यासक श्री. अनिल धीर यांनी दिला आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी श्री. धीर पुढे म्हणाले की, पोलंड आणि जपान या देशांनी प्रारंभीपासूनच अवैध घुसखोरी होऊ दिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसुद्धा याच धर्तीवर प्रयत्नरत आहेत. हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्ये कठोर कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीवरून भारताने धडा घेऊन अवैध घुसखोरी आणि वास्तव्याविषयी देशात कठोर कायदे लागू करायला हवेत.

या वेळी ‘विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल म्हणाले की, सध्या फ्रान्समध्ये दंगली घडवून आणल्या जात आहेत, तो पूर्वीपासूनच अल्पसंख्यांकांचा ‘ग्लोबल पॅटर्न’ राहिला आहे. प्रथम शरणार्थी म्हणून जायचे, नंतर तेथील संस्कृती, वारसा, ऐतिहासिक वास्तू नष्ट करून तेथील लोकांनाच शरणार्थी बनवायचे आणि तिथे ‘दार-उल-इस्लाम’चे राज्य आणायचे. काही वर्षापूर्वी भारतामध्येही अवैध पद्धतीने आलेले रोहिंग्या मुसलमान यांचाही असाच धोका आहे. आज भारतात अनेक ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. एकूणच भारतविरोधी शक्तीचा बिमोड करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन शासनाला साहाय्य करावे लागेल.

या वेळी जर्मनी येथील सुप्रसिद्ध लेखिका मारिया वर्थ म्हणाल्या की, सध्या फ्रान्समध्ये झालेल्या दंगली या पूर्वनियोजित होत्या. फ्रान्स आणि विविध देशांतील राजकीय नेते शरणार्थीं मुसलमानांचा दंगली अन् हिंसाचार करण्यासाठी वापर करत आहेत; मात्र फ्रान्समध्ये शरणार्थी मुसलमानांनी घडवून आणलेल्या दंगलीचे समर्थन करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत फ्रान्समधील स्थिती पाहता भारताने खूप सतर्क रहायला हवे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *