Menu Close

शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांची सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदनाद्वारे मागणी !

मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली मशीद !

मुंबई – जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ या ठिकाणी ‘सिटी सर्व्हे क्रमांक १६२’ या शासकीय जागेत अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली. ती हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २७ जुलै २०१३ या दिवशी शासकीय निर्णयानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला होता; मात्र या निर्णयाला १० वर्षे होऊनही यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने त्याची कार्यवाही करावी, यासाठी १९ जुलै या दिवशी फलटण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटून निवेदन दिले. त्यावर देसाई यांनी ‘यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून कारवाई करतो’, असे आश्‍वासन दिले.

डावीकडून श्री. सुनील घनवट, श्री. आशिष कापसे, डॉ. निंबाळकर, श्री. मंगेश खंदारे आणि निवेदन स्वीकारतांना मंत्री शंभूराज देसाई

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, आशिष कापसे, तसेच डॉ. निंबाळकर, मंगेश खंदारे आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत : सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *