Menu Close

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्याला अटक !

  • इस्लामिक स्टेटसाठी काम करून घातपात करण्याचा रचला होता कट !
  • सहारणपूर येथूनही २ बांगलादेशींना अटक !
  • केवळ मदरशांतूनच आतंकवादी निर्माण होतात, असे नाही, तर अशा विश्‍वविद्यालयांतूनही ते निर्माण होतात !

अलीगड (उत्तरप्रदेश) – आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटसाठी काम करणार्‍या फैजान अंसारी उपाख्य फैज या १९ वर्षीय विद्यार्थ्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली. तो अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला झारखंडमधील लोहरदगा येथून अटक करण्यात आली. तो भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचत होता. दुसरीकडे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने सहरणपूरमधील देवबंद येथून २ बांगलादेशी मुसलमानांना अटक केली. ते भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *