Menu Close

बांगलादेशात धर्माधाने दुर्गादेवीच्या मंदिरात घुसून केली मूर्तींची तोडफोड !

  • बांगलादेशात हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे धोक्यात असतांना त्यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार पावले उचलणार का ?
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – ब्राह्मणवारिया जिल्ह्यातील नियामतपूर या गावात २० जुलैला रात्री ९.३० वाजता खलील मियाँ नावाच्या धर्मांधाने श्री दुर्गादेवी मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. या मूर्ती फोडतांना खलील मियाँ ‘अल्ला-हू-अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत होता. ही माहिती मिळताच हिंदू मंदिरात जमा झाले. त्या वेळी खलीलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

१. पोलीस अधीक्षक महंमद शेखावत हुसेन म्हणाले, ‘‘खलीलला अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’

२. खलील हा नियमतपूर येथे त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता. त्या वेळी त्याचे स्थानिकांशी भांडण झाले. यामुळे त्याने मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

३. या प्रकरणी श्री दुर्गादेवी मंदिराचे अध्यक्ष जगदीश दास यांनी खलील याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात न्यायालयात खटला प्रविष्ट केली आहे. ‘या घटनेमुळे हिंदूंमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे’, असे  दास यांनी सांगितले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *