Menu Close

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !

हिंदूबहुल देशात हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येणे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! हिंदू असेच निद्रिस्त राहिले, तर मिझोरामधील हिंदूंवर आली तशी वेळ देशभरातील हिंदूंवर येईल ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

आयझॉल (मिझोराम) – मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघड झाल्यानंतर मिझोराममध्ये रहाणार्‍या मैतेई या हिंदु समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हिंदूंना मिझोराममधील ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने राज्य सोडून जाण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे मिझोराम राज्यातून मैतेई समाजाचे लोक स्थलांतरित होऊ लागले आहेत. काही लोकांनी विमानतळ आणि इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. दुसरीकडे ‘आवश्यकता भासल्यास या लोकांना विमानाद्वारे मणीपूरमध्ये सुरक्षितरित्या आणले जाईल’, असे मणीपूर सरकारने म्हटले आहे.

१. मणीपूरमध्ये हिंसाचार चालू झाल्यापासून तेथील १२ सहस्र ५८४ कुकी आणि झोमी या समाजांतील लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. मिझोराममधील ‘मिझो नॅशनल फ्रंट’ मणीपूरमधील महिलांना विवस्त्र केल्याच्या घटनेविषयी या आतंकवादी संघटनेने  संताप व्यक्त केला आहे. याच संघटनेने मिझोराममध्ये रहाणार्‍या मैतेई समुदायाच्या लोकांना उघडपणे धमकी दिली होती.

२. मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगार यांच्यासह अनुमाने २ सहस्र मैतेई समाजाचे लोक रहातात. धमकीनंतर पोलीस उपमहानिरीक्षकांनी एक आदेश प्रसारित केला होता, ज्यात आयझॉलमधील मैतेईंच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *