Menu Close

आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

उडुपी येथील महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात धर्मांध विद्यार्थिनींनी हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्‍हिडिओ काढल्‍याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

धारवाड (कर्नाटक) – उडुपीच्‍या ‘नेत्रज्‍योती पॅरामेडिकल’ महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात भ्रमणभाषच्‍या साहाय्‍याने हिंदु विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्‍यात आले नाही, असे राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या सदस्‍या खुशबु सुंदर यांनी म्‍हटले आहे. खुशबू सुंदर यांच्‍या विधानाचा मी निषेध करतो. चित्रीकरण करणार्‍या विद्यार्थिनींनी क्षमायाचना करणारे पत्र दिलेले आहे, म्‍हणजे त्‍यांनी त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली आहे. असे असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे कितपत योग्‍य आहे ?, असा प्रश्‍न श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी उपस्‍थित केला. ते म्‍हणाले की, राज्‍य सरकारने हे प्रकरण अत्‍यंत गांभीर्याने घेतले पाहिजे. गृहमंत्री प्रकरण दडपून टाकण्‍याविषयी बोलत आहेत, हे योग्‍य नाही.

१. ‘बेंगळुरूच्‍या डिजे हळ्ळी दंगलीमधील निरपराध्‍यांवर खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला’ असे म्‍हणणारे काँग्रेसचे आमदार तनवीर सेठ यांच्‍याविषयी श्री. मुतालिक म्‍हणाले की, ही घटना घडून २ वर्षे झाली आहेत. आरोपी निरपराध होते, तर तेव्‍हाच शेठ यांनी पत्र का लिहिले नाही ? आता सत्तेवर आल्‍यावर तनवीर सेठ यांनी पत्र लिहिले आहे. याचा निषेध केलाच पाहिजे. आरोपींना सोडून दिले, तर ते पुढे निश्‍चितच आतंकवादी होतील. त्‍यांना सोडले, तर आम्‍ही संपूर्ण राज्‍यात रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करू.

२. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री अश्‍वत्‍थ नारायण म्‍हणाले की, खुशबू यांनी  ‘घटनाच घडली नाही’, असे म्‍हणणे ही त्‍यांची वैयक्‍तिक प्रतिक्रिया आहे. घटना घडली आहे, हे सत्‍य आहे. चित्रीकरण झाले आहे, हे सत्‍य आहे. घटनेविरुद्ध भाजप आंदोलन करेल, हे निश्‍चित.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात


धर्मांध विद्यार्थिनींनी गुप्त कॅमेराद्वारे हिंदु विद्यार्थिनींची छायाचित्रे काढून ती मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये केली प्रसारित !

उडुपी (कर्नाटक) येथील ३ धर्मांध विद्यार्थिनींचे कुकृत्य !

केवळ धर्मांध तरुणच नव्हे, तर तरुणीही हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची संधी शोधत असतात, हेच वारंवार दिसून आले आहे. सर्वधर्मसमभाववाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

उडुपी (कर्नाटक) – कर्नाटकातील अंबलपाडी बायपास येथील नेत्र ज्योती या खासगी महाविद्यालयामध्ये ३ मुसलमान विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात कॅमेरा लावल्याचे निष्पन्न झाले आहे. याद्वारे त्यांनी हिंदु विद्यार्थिनींची छायाचित्रे काढून ती मुसलमान मुलांमध्ये प्रसारित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी काढलेली काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे घृणास्पद कृत्य या ३ विद्यार्थिनी करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर या ३ विद्यार्थिनींसह अन्य विद्यार्थ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्या वेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी यात हस्तक्षेप केला आणि विद्यार्थ्यांना शांत केले. यानंतर या ३ विद्यार्थिनींना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांनी या ३ जणींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१. या ३ विद्यार्थिनींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या संघटनांनी पोलीस अधीक्षक अक्षय हाके यांच्याकडे केली आहे.

२. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थिनींना निलंबित केले; मात्र त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *