हिंदु जनजागृती समितीचे केंद्रशासनाला निवेदन !
यवतमाळ, – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून २४ जुलै या दिवशी दिले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रूपाली बेहरे यांनी निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यातही वक्फ बोर्डाने हिंदूंच्या भूमी कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. अशाच प्रकारे तामिळनाडूतील एक संपूर्ण गाव आणि त्या गावातील १५०० वर्षांपूर्वीचे श्रीचंद्रशेखर स्वामींचे मंदिरही वक्फ बोर्डाने बळकावून ती ‘वक्फ बोर्डा’ची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. वर्ष २००९ मध्ये ४ लाख एकर भूमी असलेल्या ‘वक्फबोर्डा’कडे वर्ष २०२३ मध्ये ८ लाख एकर भूमी कशी काय आली ? या संपूर्ण प्रकरणाविषयी केंद्रीय स्तरावर अन्वेषण व्हायला हवे.