हिंदूंनो, या देशात सरकार तुमचे रक्षण करत नाही आणि तुम्हालाही स्वतःचे रक्षण करू देत नाही, हे लक्षात घ्या आणि स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
अयोध्या : येथे बजरंग दलाकडून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे शिबीर आयोजित केल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहभागी कार्यकर्ते हाती बंदूक घेऊन प्रशिक्षण घेत असून प्रतिस्पर्ध्यांना इस्लामी वेशात दाखवण्यात आले होते. यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्याविषयी आयोजक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी या कार्यक्रमात काहीच चुकीचे नसल्याचे सांगत पाठिंबा दिला होता.
हिंदूंनो, केवळ शिवसेनाच असे म्हणण्याचे धाडस करते, हे लक्षात घ्या !
आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घ्या ! – शिवसेना
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत म्हणाले, देशामध्ये जैश-ए-महंमद, तोयबा यांची प्रशिक्षण केंद्रे चालतात. त्यासाठी ते काय शासनाची अनुमती घेतात ? जर आपले लोक त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घेत असतील, तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला ? हे केवळ निवडणुकीचे सूत्र आहे. उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी आतंकवादाविरुद्ध लढायचे असेल, तर हातात शस्त्रेे घ्यावी लागतील, असे म्हटले असून ते योग्य आहे.
(म्हणे) आम्हालाही शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणाची अनुमती हवी ! – मुसलमान धर्मगुरूंची मागणी
उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी स्वरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूत्राचे समर्थन केल्याचे पाहून मुसलमान युवकांनाही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची अनुमती मिळण्याची मागणी केली आहे. अब्बास यांच्या म्हणण्यानुसार, देशातील दंगलीत मुसलमानांनाच अधिक हानी सोसावी लागते. यासाठी त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. (चोरांच्या उलट्या बोंबा ! देशात प्रथम धर्मांधाकडून दंगली करण्यात येतात आणि त्यात सर्वाधिक हिंदूंच भरडले जातात; म्हणूनच हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अधिक आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात