गोलघाट (आसाम) येथील लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण उघड !
- अशा लव्ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असतांना त्यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !
- मणीपूरमध्ये चालू असलेल्या दंगलींसारख्या भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसणारी अमेरिका शेजारील राज्य आसाममधील अशा घटनेवर कधीच काही बोलणार नाही, हे जाणा !
गोलघाट (आसाम) – येथील नजीबुर रहमान याने त्याची पत्नी संघमित्रा (वय २४ वर्षे) आणि तिचे आई-वडील यांच्या शरिराचे कुर्हाडीने तुकडे केले. त्यानंतर त्याने त्याच्या ९ मासांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. राज्यात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. नजीबूर हा यांत्रिक अभियंता आहे. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते.
१. संघमित्रा आणि नजीबुर यांच्यातील प्रेमप्रकरणाचा आरंभ फेसबुकद्वारे जून २०२० मध्ये झाला. ऑक्टोबर २०२० मध्ये कोलकाता येथे पळून जाऊन दोघांनी विवाह केला.
२. संघमित्राच्या आई-वडिलांना नजीबुर याच्याशी मुलीने जोडलेले नाते मान्य नसल्याने त्यांनी मुलगी संघमित्रा हिच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे तिला १ मास न्यायालयीन कारावास भोगावा लागला. पुढे ती तिच्या आई-वडिलांसमवेत राहू लागली.
३. कालांतराने जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा दोघे पळून गेले. या वेळी ती गरोदर होती. दोघे ५ मास चेन्नई येथे राहिले. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. मार्च २०२३ मध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संघमित्रा तिच्या मुलासह आई-वडिलांसमवेत राहू लागली. तिने नजीबुर रहमान याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार नजीबुरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे तो ४ आठवडे कारागृहात होता.
४. कारागृहातून जामिनावर मुक्त झाल्यावर त्याने २४ जुलै या दिवशी पत्नी संघमित्रा, सासरे संजीव घोष आणि सासू जुनू घोष यांची हत्या केली.
मार्च 2020 में दोनों में फिर से झगड़ा हुआ और संघमित्रा अपने बेटे के साथ माँ-बाप के पास रहने चली गई। नजीबुर रहमान पर यौन उत्पीड़न का आरोप लगा।https://t.co/mRMl7VKpRJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 26, 2023
लव्ह जिहादचे दुष्परिणाम समोर आणणारे प्रकरण ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
संघमित्रा आणि तिचे पालक यांची हत्या, हे लव्ह जिहादचे दुष्परिणाम समाजासमोर आणणारे आणखी एक प्रकरण होय. या प्रकरणाचे आरोपपत्र १५ दिवसांत न्यायालयासमोर सादर करण्यात येईल आणि नजीबुर रहमान याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे. सरमा यासंदर्भात म्हणाले की, जेव्हा नजीबुर आणि संघमित्रा कोलकाता येथे पळून गेले, तेव्हा त्याने संघमित्राला अमली पदार्थांचे सेवन करण्यास शिकवले होते. ती नशेत असतांना तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. संघमित्रा नजीबूरसोबत रहात असतांना तो तिचा जाच करीत असे. सरमा पुढे म्हणाले की, (मुसलमान) पुरुषांनी नाव पालटल्यामुळे मुली त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. जेव्हा मुलींना त्यांच्या चुकीची जाणीव होते, तेव्हा त्यांचा समाज मुलींना स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांना धर्मांतर करावे लागते आणि यातनामय जीवनाविना त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक रहात नाही. स्रोत : दैनिक सनातन प्रभात |