Menu Close

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे ४ म्‍हशींना कत्तलीपासून जीवनदान !

प्रतिकात्मक छायाचित्र

नेवासा (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – वाळुंज पशूवधगृहाच्‍या दिशेने जाणारी गाडी २३ जुलै या दिवशी गोरक्षकांना नेवासामध्‍ये दिसली. त्‍यांनी ती गाडी थांबवली आणि गाडीची पहाणी केली असता गाडीमध्‍ये दाटीवाटीने कोंबलेल्‍या अवस्‍थेत ४ घायाळ स्‍थितीत म्‍हशी आढळून आल्‍या. त्‍यांनी वाहनचालकाला विचारपूस केली असता चालकाने त्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यांनी त्‍वरित मानद पशूकल्‍याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांच्‍याशी संपर्क साधला आणि त्‍यांना सर्व घटना सांगितली. ऋषिकेश भागवत यांनी नेवासा पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक डोईफोडे यांना याविषयी माहिती कळवताच पोलिसांच्‍या साहाय्‍याने वाहनचालकाला कह्यात घेऊन त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. सर्व म्‍हशींना संगमनेर येथील गोशाळेत पाठवण्‍यात आले. या कारवाईसाठी श्री. मिलिंद एकबोटे यांनी पुष्‍कळ सहकार्य केले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *