Menu Close

हडपसर (पुणे) येथील ‘इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्याला अटक !

विविध आतंकवादी संघटनांना साहाय्‍य करत असल्‍याचे उघड !

धर्मांध कितीही शिकले, तरी ते जिहादला नेहमीच प्रथम प्राधान्‍य देतात, हे पुन्‍हा एकदा सिद्ध करणारी घटना !

हडपसर (जिल्‍हा पुणे) – येथील नामांकित ‘नोबेल हॉस्‍पिटल’मध्‍ये अनेक वर्षे काम करणारा ४२ वर्षीय भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याच्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. डॉ. अदनान अली याला राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून (एन्‌आयएकडून) कोंढवा परिसरातून २७ जुलै या दिवशी अटक करण्‍यात आली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. त्‍याच्‍या कोंढव्‍यातील घरावर धाड घालून ‘इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌स’ आणि ‘इसिस’शी संबंधित अनेक दस्‍तावेज जप्‍त केले आहेत. आरोपी पुण्‍यातील तरुणांचा बुद्धीभेद करून त्‍यांना इसिस या संघटनेमध्‍ये भरती करायचा, अशी माहिती समजली आहे. आरोपीने ‘इस्‍लामिक स्‍टेट’, ‘इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड लेव्‍हंट’, ‘इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड सीरिया’ यांसारख्‍या वेगवेगळ्‍या नावांनी ओळखल्‍या जाणार्‍या ‘इसिस’च्‍या आतंकवादी कारवायांमध्‍ये साहाय्‍य केल्‍याचे समोर आले आहे.

मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्‍यानंतर ३ जुलै या दिवशी ‘एन्.आय.ए.’ने इतर ४ जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्‍यातील जुबेर नूर महंमद शेख,अबू नुसैबा आणि ठाणे येथील शरजील शेख आणि झुल्‍फिकार अली बडोदावाला अशी त्‍यांची नावे आहेत.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *