Menu Close

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

  • सरकारी जागेत घरे बांधण्यात आल्याचे निष्पन्न !
  • दंड, तसेच स्वत:हून अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने दिली १५ दिवसांची समयमर्यादा !

 

  • राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना अशा प्रकारे कठोर दंड दिल्यावरच ते सुतासारखे सरळ होतील. उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनासारखेच कठोर नियम अन्य भाजपशासित राज्यांतही लागू करणे आवश्यक !
  • ‘भारत तेरे तुकडे होंगे’ या घोषणेला समर्थन देणार्‍या आणि धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवण्यात धन्यता मानणार्‍यांनी उत्तरप्रदेश प्रशासनाच्या या कारवाईला विरोध केला, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक 
पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारे धर्मांध

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलै या दिवशी मुहर्रमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी सर्वांवर गुन्हा नोंदवला होता. या ३३ आरोपींपैकी १३ जणांची घरे जिल्हा प्रशासनाच्या भूमीवर अनधिकृत नियंत्रण मिळवून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित १३ जणांना १५ दिवसांत हे अतिक्रमण स्वत:हून हटवण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच या १३ जणांना एकूण १ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून प्रत्येकाला किमान ३२ सहस्र ते अधिकाधिक १९.८ लाख रुपये भरावे लागणार आहेत, असे शासकीय अधिकार्‍यांनी सांगितले. १५ दिवसांत हे केले नाही, तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जौनपूर जिल्ह्यातील मीरगंजच्या जवळ असलेल्या गोधना आणि किशुनदासपूर येथील हे प्रकरण आहे. ९ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट या दोन दिवशी स्थानिक प्रशासनाने आरोपींच्या घरांचे अन्वेषण केले असता लक्षात आले की, १३ आरोपींनी सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवले आहे.

अटक करण्यात आलेल्या ३३ जणांची नावे !

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांमध्ये साहिल अली, ईदू, कैफ, महंमद कैश, महंमद शरीफ, सलीम, दिलशाद, सज्जाकचा मुलगा संजय, तालिम, नौशाद, महंमद अली, वसीम, अफझल, महंमद कैफ, इबरार, आफताब, इरशाद, मुश्ताक, दिलशाद अली, शेर अली, रफीक, इश्तियाक, एजाज, इबनैन, मजीद, सरफराझ, कैफ, असलम, महताब, अब्दुल अजीज, महंमद शमीम, इजाज अहमद आणि महंमद फिरोझ यांना अटक करण्यात आली आहे. हे जौनपूर जिल्हा, तसेच प्रयागराज येथील रहिवासी आहेत.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *