असहिष्णुतेची ओरड करणारे आता या घटनेस सहिष्णुता संबोधणार का ?
उडागमंगलम् (ऊटी) : येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड मारून देवतांच्या मूर्ती तोडल्या. ही घटना शहरात आलेल्या एका पर्यटकाने भ्रमणभाषात टिपली. हा व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
सदर व्यक्तीने स्थानिक हिंदूंना याविषयी माहिती दिल्यावर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १५० हिंदुत्वनिष्ठांनी पुडुमुंड पोलीस स्थानकात याविषयी तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून महिलेस चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात