Menu Close

सतना (मध्यप्रदेश) येथे ३ हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पादरीसहित तिघांना अटक

religious_conversion

सतना (मध्यप्रदेश) : येथील पोलिसांनी १ पादरी आणि त्यांच्या २ सहकारी महिला यांना ३ हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे.

या तिघांनी गोरइया गावातील प्रशांत गुप्ता, रामबन आदिवासी आणि हेमराज वर्मा यांना अबेर चर्च मध्ये बोलावले होते. गुप्ता यांनी पोलिसांना सांगितले की, मी पादरी ए.बी. अँथनी यांच्या संपर्कात होतो. त्यांनी आणि अन्य दोघांना नोकरी देण्याचे आमीष दाखवून आमचे धर्म परिवर्तन केले.

राज्याच्या मागसवर्गीय आयोगाच्या सदस्या लक्ष्मी यादव म्हणाल्या की, येथे धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *