मुंबई – फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत. तरीही हिंदु राष्ट्र वाईट ? हे सगळे कधी थांबणार ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. ‘गप्पा मस्ती’ या ‘पॉडकास्ट’वर (आकाशवाणीप्रमाणे ऑडिओ प्रसारणाचे एक खासगी माध्यम) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…” https://t.co/AHx7EwWqG9 via @loksattalive #sharadponkshe #Hindutva #Constitution #BhagavadGita
— LoksattaLive (@LoksattaLive) August 26, 2023
शरद पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘जोपर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच येथे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव टिकून आहे. ज्या दिवशी हिंदू ४९ टक्के होतील आणि मुसलमान ५१ टक्के होतील, त्या दिवशी सगळे संपलेले असेल. जगभरात हिंदूंना कुठेही पारपत्र मिळण्यासाठी अडचण येत नाही; परंतु ‘खान’, ‘सय्यद’ अशी मुसलमान नावे असलेल्यांना थांबवले जाते. ‘शांततेचा धर्म’ असे एकीकडे म्हणता, मग एकही इस्लामी देश शांत का नाही ? तिथे त्यांना मारायला हिंदू नाही जात ना, मग पाकिस्तान एवढे का धगधगत आहे ?’’
भगवद्गीता कि राज्यघटना ?
मला कुणी ‘भगवद्गीता कि राज्यघटना ?’ असा प्रश्न विचारला, तर एका क्षणाचाही विलंब न लावता मी ‘राज्यघटना’ असे उत्तर देईन. माझी ‘भगवद्गीता’ नंतर येईल. राज्यघटना पहिली येईल. हाच प्रश्न मुसलमानाला विचारा आणि तो काय म्हणेल, ते पहा. भविष्यात मला अमेरिकेत माझे आयुष्य घालवावे लागले, तर अमेरिकेची राज्यघटना ही माझ्यासाठी प्राधान्याची असेल. घरात भगवद्गीता पठण आणि ‘जय श्रीराम’ म्हणेन; पण बाहेर पडलो की, मी अमेरिकन असेन. (छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारन यांनी हिंदु धर्माचा आदर्श घेऊनच आक्रमकांच्या विरोधात लढा दिला. राष्ट्ररक्षणाला प्राधान्य देण्याची शिकवण हिंदु धर्मच देतो. अशा प्रकारे शिकवण देणारा हिंदु धर्म जगातील एकमेवद्वितीय आहे. प्राचीन काळापासून भगवद्गीता आणि अन्य हिंदु धर्मग्रंथ यांच्या आधारे राष्ट्राचा कारभार चालत आला आहे, हेही समस्त हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात