Menu Close

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांस आयात ! हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

हनुमंत परब

फोंडा – बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे. सरकारने याकडे गंभीरतेने पाहून संबंधितांवर कारवाई करावी. गोमांस गोव्यात आयात करण्यासाठी पशूवैद्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. संशयितांनी गोमांसाची वाहतूक करण्यासाठी समवेत बनावट प्रमाणपत्र आणले हाते. या प्रमाणपत्रावर वाहनाचा नोंदणी क्रमांक ‘के ए २२ डी २०२९’ असा लिहिला आहे; मात्र बायथाखोल, बोरी येथे कह्यात घेण्यात आलेल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक ‘जी ए ०८ यू ५११२’ आहे. हे प्रमाणपत्र ‘एग्रो फूडस् अँड डेअरी प्रॉडक्ट्स’चा व्यवसाय करणार्‍या संस्थेने दिला आहे. गोमांस हे ‘डेअरी प्रॉडक्ट’ कसे होऊ शकते ? या प्रमाणपत्रावर मुंबईस्थित पशूवैद्याची स्वाक्षरी आहे. मुंबईस्थित पशूवैद्य बेळगावस्थित प्रमाणापत्रावर स्वाक्षरी कशी करू शकतो ? बेळगाव येथे एकही अधिकृत पशूवधगृह नाही आणि गोव्यात गोमांस आयात करण्यासाठी उसगाव, फोंडा येथील शासनाच्या गोवा मांस प्रकल्पाच्या अधिकार्‍याचे प्रमाणपत्र आवश्यक असते; मात्र गोमांसाची अशी अधिकृत प्रमाणपत्राविना वाहतूक कशी केली जाते ? गोव्यात सर्रासपणे अशा बनावट प्रमाणपत्राच्या आधारे गोमांसाची आयात केली जात आहे. बेळगाव येथून बनावट प्रमाणपत्र देण्याच्या प्रकाराच्या विरोधात बेळगाव येथे पोलीस तक्रार करण्यासाठी जातांना काही वर्षांपूर्वी गोव्यातील गोरक्षक तथा गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब आदी गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण झाले होते.

गोव्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करा !
गोव्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेली अनधिकृत पशूवधगृहे चालू आहेत आणि यावर सरकारचे पशूसंवर्धन खाते आणि पोलीस यंत्रणा कोणतीच कारवाई करत नाही. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याचा आदेश यापूर्वीच दिलेला आहे; मात्र या आदेशाचे पालन करण्यात येत नसून यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनी अनधिकृत पशूवधगृहांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा गोप्रेमींना आंदोलन छेडणे भाग पडणार आहे’’, अशी चेतावणी ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी दिली आहे.

बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे. सरकारने याकडे गंभीरतेने पाहून संबंधितांवर कारवाई करावी. गोमांस गोव्यात आयात करण्यासाठी पशूवैद्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. संशयितांनी गोमांसाची वाहतूक करण्यासाठी समवेत बनावट प्रमाणपत्र आणले हाते. या प्रमाणपत्रावर वाहनाचा नोंदणी क्रमांक ‘के ए २२ डी २०२९’ असा लिहिला आहे; मात्र बायथाखोल, बोरी येथे कह्यात घेण्यात आलेल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक ‘जी ए ०८ यू ५११२’ आहे. हे प्रमाणपत्र ‘एग्रो फूडस् अँड डेअरी प्रॉडक्ट्स’चा व्यवसाय करणार्‍या संस्थेने दिला आहे. गोमांस हे ‘डेअरी प्रॉडक्ट’ कसे होऊ शकते ? या प्रमाणपत्रावर मुंबईस्थित पशूवैद्याची स्वाक्षरी आहे. मुंबईस्थित पशूवैद्य बेळगावस्थित प्रमाणापत्रावर स्वाक्षरी कशी करू शकतो ? बेळगाव येथे एकही अधिकृत पशूवधगृह नाही आणि गोव्यात गोमांस आयात करण्यासाठी उसगाव, फोंडा येथील शासनाच्या गोवा मांस प्रकल्पाच्या अधिकार्‍याचे प्रमाणपत्र आवश्यक असते; मात्र गोमांसाची अशी अधिकृत प्रमाणपत्राविना वाहतूक कशी केली जाते ? गोव्यात सर्रासपणे अशा बनावट प्रमाणपत्राच्या आधारे गोमांसाची आयात केली जात आहे. बेळगाव येथून बनावट प्रमाणपत्र देण्याच्या प्रकाराच्या विरोधात बेळगाव येथे पोलीस तक्रार करण्यासाठी जातांना काही वर्षांपूर्वी गोव्यातील गोरक्षक तथा गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब आदी गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण झाले होते.

गोव्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करा !

गोव्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेली अनधिकृत पशूवधगृहे चालू आहेत आणि यावर सरकारचे पशूसंवर्धन खाते आणि पोलीस यंत्रणा कोणतीच कारवाई करत नाही. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याचा आदेश यापूर्वीच दिलेला आहे; मात्र या आदेशाचे पालन करण्यात येत नसून यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनी अनधिकृत पशूवधगृहांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा गोप्रेमींना आंदोलन छेडणे भाग पडणार आहे’’, अशी चेतावणी ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी दिली आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *