Menu Close

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

श्री गणेशमूर्तींची केली तोडफोड !

  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होते, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे कधी ‘भारतात हिंदु असुरक्षित आहेत’, असे म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

 

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली. या प्रकरणी पोलिसांनी अमीन हबीब समा, रफीक इस्माइल मंसुरी आणि समीर युसूफ शाहमदार यांना अटक केली.

किशन राठोड हे इरफान सिद्दीकी यांनी भाड्याने दिलेल्या घरात रहात होते. याच ठिकाणी ते मूर्ती बनवत होते. यावरून आक्रमण करणारे त्यांना काही दिवसांपासून त्रास देत होते. शिवीगाळ करणे, दगडफेक करणे आदी प्रकार यापूर्वीही घडले होते. तसेच एका कारागिरालाही त्यांनी मारहाण केली होती. सिद्दीकीच्या जागेत मूर्ती बनवण्याला ते विरोध करत होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *