Menu Close

जगभरातील मुसलमानांकडून ‘हलाल हॉलिडेज’ची वाढती मागणी !

(‘हलाल हॉलिडेज’ म्हणजे इस्लामी श्रद्धा जपत सुट्टयांचा आनंद घेता येऊ शकणारी ठिकाणे)

  • जीवनातील कुठल्याही क्षणी मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यावरून लक्षात येते !
  • हिंदूंनी जर ‘हिंदु पर्यटना’ची मागणी केली, तर एव्हना जगभरातील देशांनी पर्यटनाचे भगवेकरण केले जात असल्याची ओरड केली असती; परंतु आता एकही देश पर्यटनाचे इस्लामीकरण केले जात असल्याची ओरड करणार नाही, याची निश्‍चिती बाळगा !
  • ‘उद्या भारतात ‘हलाल पर्यटना’ची मागणी होऊ लागल्यास अशी ठिकाणे ही हिंदूंच्या धर्मातराची नवी केंद्रे असतील’, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे ते काय ? -संपादक

 

लंडन (ब्रिटन) – जगभरातील मुसलमानांकडून ‘हलाल हॉलिडेज’च्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा सुट्टयांसाठी मुसलमानांकडून इस्लामी देशांची प्राधान्याने निवड केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

१. ब्रिटनमधील प्रभावशाली व्यक्तीमत्व असलेल्या झाहरा रोज या मुसलमान महिलेने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत ३० हून अधिक ‘हलाल हॉलिडेज’ अनुभवले आहेत. त्या म्हणतात, ‘माझ्यासाठी हलाल सुट्ट्या आणि सामान्य सुट्ट्या यांमधील सर्वांत मोठा भेद म्हणजे एकांतपणा. ‘हलाल हॉलिडेज’च्या काळात हलाल अन्नही सहज उपलब्ध होते, असेही झाहरा रोज यांनी सांगितले.

२. इस्तांबुल (तुर्किये) येथील ३६ वर्षीय हेजर सुजोगलू आदिगुजाई या मुसलमान महिलेने सांगितले की, त्यांना तुर्कियेमध्ये ‘हलाल हॉलिडेज’साठी जागा शोधण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही; परंतु त्या सहकुटुंब जेव्हा इस्लामेतर देशांमध्ये प्रवास करतात, तेव्हा त्यांना ‘हलाल हॉटेल’साठी फार शोधाशोध करावी लागते. आदिगुजाई या दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतात. त्या म्हणाल्या, ‘हलाल हॉटेल’मध्ये नमाजसाठी चटई देतात. आमच्या मुलांनी आमचा धर्म आणि संस्कृती यांचे पालन करणार्‍या लोकांसमवेत रहावे, अशी आमची इच्छा आहे. पर्यटन उद्योग अद्याप ‘हलाल हॉलिडेज’ची संकल्पना पूर्णपणे विकसित करू शकलेला नाही, असेही मत आदिगुजाई यांनी व्यक्त केले.

३. ‘ग्लोबल मुस्लिम ट्रॅव्हल इंडेक्स’नुसार, वर्ष २०२२ मध्ये ‘हलाल ट्रव्हल’ व्यवसाय २२० अब्ज डॉलर एवढा झाला. काही आस्थापने ‘हलाल पर्यटना’त विशेष रूची दाखवतात, तर काही आस्थापने त्याकडे केवळ पर्याय म्हणून बघतात.

४. मालदीवचे पर्यटनमंत्री डॉ. अब्दुल्ला मौसूम म्हणतात, ‘‘मालदीव हा मुसलमान देश असून आमच्याकडे पूर्वीपासूनच मुसलमानांना अनुकूल असे पर्यटन आहे. हे क्षेत्र फार झपाट्याने वाढत आहे. अनेक ‘रिसॉर्ट’मध्ये खोल्यांचे वितरण, खोल्यांची रचना आणि खाण्याचे पदार्थ यांविषयी मुसलमानांना अनुकूल वातावरण असते.

‘हलाल पर्यटना’त मलेशिया अग्रस्थानी !

‘ग्लोबल मुस्लिम ट्रॅव्हल इंडेक्स’नुसार ‘हलाल पर्यटन’ क्षेत्रात बहुतांश मुसलमान देशांचे वर्चस्व आहे. यामध्ये इंडोनेशिया आणि मलेशिया हे देश अग्रस्थानी आहेत. या सूचीमध्ये सिंगापूर (११वे स्थान) आणि ब्रिटन (२०वे स्थान) या २ बिगर मुसलमान देशांनीही स्थान मिळवले आहे. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आता ‘हलाल मांस’ दिले जाते. हॉटेल कर्मचार्‍यांना मध्यपूर्वेतील धर्म आणि सांस्कृती समजण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *