Menu Close

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे (डावीकडे)

चिपळूण – ‘हलालमुक्त भारत अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा चालू आहे. या दौर्‍याच्या अंतर्गत चिपळूण येथे जाहीर व्याख्यानानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हलाल प्रमाणपत्र आणि अर्थव्यवस्था यांचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ या अभियानाचा चिपळूण येथून प्रारंभ करण्याचा संकल्प केला. या दृष्टीने चिपळूण येथील पत्रकारांना माहिती देण्यासाठी शहरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी श्री. रमेश शिंदे, चिपळूण येथील मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, शहराध्यक्ष आशिष खातू, विश्‍व हिंदु परिषदेचे पराग ओक, समितीचे श्री. सुरेश शिंदे, खेड येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिराचे विश्‍वस्त रमेश कांजी नंदा उपस्थित होते. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकारांना हलाल अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम सांगितले. त्याचसमवेत हलाल अर्थव्यवस्था रोखण्यासाठीच्या उपाययोजनाही सांगितल्या.

श्री. रमेश शिंदे

रमेश शिंदे म्हणाले की,

१.  गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे.

२. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि इस्लामी देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत.

३. भारत सरकारच्या अधिकृत ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल’ प्रमाणिकरणाची आवश्यकताच काय ?

४. आज ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गर किंग’ ‘पिझ्झा हट’ यांसारखी नामवंत आस्थापने हिंदु, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील १५ टक्के मुसलमान समाजासाठी ८० टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती का ?

क्षणचित्रे

१. मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी ‘चिपळूण मधील सर्व व्यापार्‍यांची आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची लवकरच बैठक घेऊन या संदर्भातील पुढील कृतीचे नियोजन करणार आहोत’, असे सांगितले.

२. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेस आमचे सहकार्य राहील’, असे प्रतिपादन केले.

३. पत्रकारांनी या मोहिमेच्या संदर्भात प्रश्‍नोतरे विचारून शंका समाधान केले. तसेच ‘हलालमुक्त भारत’ या अभियानाच्या संदर्भात जाणून घेतले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *