Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांना राखी बांधतांना सौ. शुभांगी मुळ्ये

रत्नागिरी – भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली.

रत्नागिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांचे प्रथम औक्षण करून त्यांना समितीच्या सौ. शुभांगी मुळ्ये यांनी राखी बांधली. या वेळी श्री. कुलकर्णी यांना सनातनचा ‘श्री गणेश पूजाविधी’ हा लघुग्रंथ भेट देण्यात आला.
येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक श्री. शैलेश सणस, श्री मरुधर विष्णु समाज रत्नागिरीचे श्री. दीपक देवल आणि केळ्ये येथील उद्योजक श्री. सुनील सहस्रबुद्धे यांना राखी बांधण्यात आली. या वेळी प्रशासकीय अधिकार्‍यांना सनातनचा ग्रंथ भेट देण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या या मोहिमेत श्री. संजय जोशी, सौ. शुभांगी मुळ्ये आणि सौ. मधुरा खेराडे सहभागी झाल्या होत्या.

चिपळूण

चिपळूण येथील प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे यांना राखी बांधतांना सौ. उज्ज्वला कांगणे

येथील प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे यांना समितीच्या सौ. उज्ज्वला कांगणे यांनी राखी बांधली. तहसीलदार श्री. प्रवीण लोकरे, नगर परिषद मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे, देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. चेतन विसपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिपळूण शहराध्यक्ष श्री. अभिनव भुरण, युवासेना चिपळूण तालुकाप्रमुख निहार कोवळे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. पराग ओक, युवासेनेचे श्री. अमेय चितळे, भाजप चिपळूण शहराध्यक्ष श्री. आशिष खातू , उद्योजक श्री. शैलेश टाकळे आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार अन् ‘मराठी समाचार चॅनेल’चे संपादक श्री. दीपक शिंदे यांना राखी बांधण्यात आली.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठ पत्रकार,मराठी समाचार चॅनेल चे संपादक श्री दीपक शिंदे याना समितीच्या सौ नयना महेश कात्रे राखी बांधताना

या वेळी समितीच्या वतीने सौ. नयना महेश कात्रे, सौ. स्नेहल गुरव, सौ. सोनाली पवार, सौ. उज्ज्वला कांगणे आणि श्री. सुरेश शिंदे हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

दापोली

नायब तहसीलदार श्री. विद्याधर वैशंपायन यांना राखी बांधताना सौ. सुहासिनी डोंगरकर

 

पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदिप भांडे यांना राखी बांधताना सौ. सुहासिनी डोंगरकर

येथील नायब तहसीलदार श्री. विद्याधर वैशंपायन आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप भांडे यांना राखी बांधण्यात आली. या वेळी सौ. सुहासिनी डोंगरकर आणि अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *