Menu Close

‘चकोते’ आस्थापनाच्या ‘रस्क’च्या वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दूतून माहिती !

मराठीतून लिखाण प्रसिद्ध करण्याची हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांची मागणी !

जागरूक हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांचे अभिनंदन ! अशी जागरूकता सर्वत्र हवी ! – संपादक

कोल्हापूर – नांदणी येथील श्री गणेश बेकरीच्या ‘चकोते प्रीमियम रस्क’च्या (टोस्टच्या) वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दू भाषांतून माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात काही हिंदुत्वनिष्ठ, विक्रेते आणि नागरिक यांनी गणेश बेकरीच्या कार्यालयाशी संपर्क साधून तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. अनेकांनी कार्यालयात दूरभाष करून ‘महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या उत्पादनांवर मराठीतून मजकूर का नाही ? उर्दूतून मजकूर लिहिण्यामागचे कारण काय ? ग्रामीण भागांतील ग्राहकांना इंग्रजी कसे कळणार ?’ आदी प्रश्‍न विचारले. यावर कार्यालयातील कर्मचार्‍यांनी ‘आम्हाला बर्‍याच जणांचे दूरभाष आले. आमचे उत्पादन दुबईत निर्यात करावे लागते, त्यामुळे आम्ही उर्दू भाषेत लिहिले आहे. तुम्ही भाषेत कशासाठी अडकता’, असे उत्तर दिले. यावर काही हिंदुत्वनिष्ठांनी, ‘परदेशात निर्यात होणार्‍या उत्पादनांची उर्दूतील माहिती महाराष्ट्रातील जनतेवर का थोपवता ? तुमचे अधिकाधिक ग्राहक ग्रामीण भागांतील असून त्यांना इंग्रजी किंवा उर्दू कसे कळणार ? त्यामुळे तुम्ही या वेष्टनावर मराठीतून मजकूर लिहिणे आवश्यक आहे’, असे ठामपणे सांगितले. यावर कार्यालयातील कर्मचार्‍यांनी ‘आमच्या व्यवस्थापनास कळवतो’, असे उत्तर दिले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *